नेरूरचा कलेश्वर

Spread the love

सतीश य. पाटणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. शैव-वैष्णव भेदविरहित असलेले हे देवस्थान महाराष्ट्रातील कानाकोप-यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.चहू बाजूंनी डोंगर रांगांनी व शेजारीच असलेले कलेश्वर तलाव यामुळे या मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलते. मंदिर मुख्य रस्त्याशेजारीच असून येथे येणा-या नवागतास हे मंदिर विश्राम स्थान म्हणून उपयुक्त ठरते.शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस नंदीच्या समोर म्हणजेच पिंडी व नंदीच्या मध्ये शुक्राचार्याची मूर्ती आहे. अशी अपवादात्मक असलेली शुक्राचार्याची मूर्ती हेसुद्धा या मंदिराचे वैशिष्टय़ आहे.मंदिराच्या डाव्या बाजूस ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू, गायत्री, सावित्री आणि लक्ष्मी अशा देवता आहेत. इतर परिवार देवता मंदिराच्या आसपास स्वतंत्र मंदिरात स्थापित केलेल्या आहेत.        धार्मिक परंपरांप्रमाणेच सांस्कृतिक उत्सवही मोठा असतो.

 पाचव्या म्हणजे शिवरात्री दिवशी श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांची रांग लागते. लोक विविध ठिकाणांवरून श्रींच्या दर्शनासाठी येतात. शिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतर श्रींची नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, विविध वाद्यवृंद व भाविकांच्या अलोट गर्दीत उसळणारा ‘पार्वती पते हर हर महादेव’ हा नाद यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहावयास मिळतो.श्रींच्या मिरवणुकीची मंदिराभोवती एक परिक्रमा पूर्ण केली जाते. मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा रथ पूर्णपणे लाकडी, कोरीव कामयुक्त, पाच मळ्यांचा बनविलेला असतो. रथाला केलेली रंगरंगोटी नेत्रदीपक असते. मिरवणुकीची परिक्रमा पहाटेपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर दशावतारांकडून मंदिरात दहिकाला व रथासमोर राधाकृष्ण नृत्य केले जाते. त्यानंतर इतर सरजामासहित श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात नेली जाते. येथेच याउत्सवाची सांगता होते. या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हायलाच हवे.

—————————————————————————————————

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *