baba mondkar

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग ची कोरोना व्हायरस विषयि स्वतंत्र पॉलिसी राज्य सरकारने जाहीर करावी तसा मागणी अहवाल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकार ला पाठवावा :-श्री बाबा मोंडकर ,अध्यक्ष पर्यटन व्यावसाईक महासंघ, सिंधुदुर्ग

Spread the love

सिंधुदुर्ग जिल्हाधीकारी यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३० एप्रिल पर्यत जिल्ह्यातील व्यापारी वर्गासाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमुळे पर्यटन व्यवसाय,शेतकरी,परमिट रूम, सलून, इलेक्ट्रिक,हार्डवेअर,कपडा व्यापारी, लहानस्टॉल.स्टेशनरी,रिक्षाचालक,टुव्हिलर,फोरव्हिलर दुरुस्ती दुकानदार व्यवसायाकांस उपासमारीची वेळ येणार आहे.शासकीय पातळीवर प्रशासनाने आदेश दिले परंतु हे आदेश देताना एकबाजूचा विचार केलेला असून सरकारने जनतेच्या हिताच्या द्रुष्टीने निर्णय घ्यायचे असते तर या व्यवसायाईकांच्या ग्रूह,वाहन
,व्यावसाईक कर्ज, दुकानभाडे, लाईट बिल,घरपट्टी तसेच या काळातील नुकसान भरपाई संदर्भात व्यापारी वर्गाला अपेक्षित असलेला आदेश काढणे गरजेचे होते गेले वर्षभरात राज्य सरकारने या संबंधी कोणतेही निर्णय घेतलेला दिसत नाही . लॉकडाऊनच्या सूचना वजा धमकी ने जिह्यातील व्यापारी असमंजस स्थितीत असून व्यवसाय कसा करावा हेच समजत नाही आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्यसरकारने मान्यता प्राप्त जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात सागरी, अग्रौ टुरिझम साठी पर्यटक जास्त पसंती देत असल्याने या जिह्यासाठी स्वतंत्र पॉलिसी बनविणे गरजेचे होते. या जिल्ह्याची आर्थिक उलाढाल ही शेती व पर्यटन व्यवसायावरच अवलंबून असून मे महिन्यापर्यत होणाऱ्या व्यावसाईक उत्पन्नावरच जिल्ह्यातील व्यापारी पुढील सहा महिने दिवाळी पर्यतअवलंबून असतात यातूनच या जिल्ह्याचा व्यावसाईकांचा व्यवसाय चालू असतो. राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील व्यावसायीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग ची कोरोना व्हायरस संबंधी स्वतंत्र पॉलिसी होण्यासाठी राज्य सरकार ला वस्तूस्थिती दर्शक अहवाल पाठविण्यात यावा व सद्य स्थितीत दिलेल्या आदेशास शितिलता द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना पर्यटन महासंघा मार्फत मेल पाठऊन करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यावसाईक महासंघ अध्यक्ष श्री. बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!