watersports

जिल्ह्यातील हॉटेल व जलक्रिडा व्यावसाईकांना एम.टी.डी.सी च्या वेबपेज वर बुकिंग साठी समाविष्ट करण्याचे आदेश…

Spread the love

पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यातील हॉटेल व जलक्रिडा व्यावसाईकांना एम.टी.डी.सी च्या वेबपेज वर बुकिंग साठी समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी यांसाठी प्रयत्न करावेत:- श्री बाबा मोंडकर.अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ

कोरोना व्हायरस मुळे सिंधुदुर्ग जिल्हातील पर्यटन व्यावसाईक उध्वस्त झाला आहे या जिल्ह्यात हॉटेल,होम स्टे,लॉजिंग व्यवसाय चालायला पर्यटनासाठी भेट देणाऱ्या देशी विदेशी नागरिकांवरच पर्यटन व्यवसाईक अवलंबून आहे. जिल्ह्यात बीच, हिस्ट्री, मेडिकल,अग्रौ,हिल टुरिझम च्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्याची क्षमता जिल्ह्यातील पर्यटन व्यावसाईकांकडे आहे .गेल्या वर्षभराच्या लॉक डाऊन काळात बँक कर्ज, घरपट्टी, लाईट बिल, घरपट्टी, कामगार पगार साठी सरकारने कुठलीही मदत न केल्याने उधार उसने पैसे घेऊन व्यावसाईकांनी देणी दिली व परत उध्दभवलेल्या लॉकडाऊन स्थितीकडे उध्वस्त कंगाल स्थितीत राज्य सरकारकडे पर्यटन व्यावसाईक अपेक्षेने पाहत आहे .आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात पर्यटन व्यवसाय १००% क्षमतेने चालू आहे. राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून मा. आदित्यजी ठाकरे यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे कारण जिल्ह्यात येणारे पर्यटक हे सागरी पर्यटनासाठी प्रामुख्याने येत असल्यामुळे हा कालावधी मे महिन्यापर्यत असतो त्यानंर पुढे पावसाळ्यात तीन ते चार महिने या भागातील पर्यटन व्यवसाय पूर्ण पणे बंद असतो. राज्य सरकारने एकमेव असलेल्या पर्यटन जिल्ह्यात येण्यास देश विदेशातील जनतेस कोविड नियमावलीचे पालन करून पर्यटनासाठी येण्यासाठी आवाहन केले तर जिल्ह्यातील पर्यटनशेत्र डेव्हलप होण्यास मदत होईल तसेच यांसाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या असलेल्या हॉटेल ,रिसॉर्ट वेबपेज वर जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट व जलक्रिडा व्यावसाईकांना समाविष्ट केल्यास महामंडळाच्या हॉटेल बुकिंग नंतर स्थानिक हॉटेल व्यवसायाकांना ही व्यवसाय मिळेल व कोरोना व्हायरस च्या काळातही त्याच्या नष्ट होत असलेल्या पर्यटन व्यवसायाला एक आशेचा किरण निर्माण होईल व या व्यवसायावर अवलंबून असलेले पूरक व्यवसाय ही उभे राहण्यास मदत होईल.जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी प्रयत्न करावे.या विषयी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसाईक महासंघा मार्फत सर्वोतपरी सहकार्य केले जाईल अशी माहिती.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ अध्यक्ष श्री. बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!