Spread the love

निसर्गाशी समतोल राखल्यास शास्वत विकास होईल

काका भिसे, आंबोली 

निसर्ग आणि माणूस यांचं नातं अगदी पूर्वापार चालत आलेला आहे निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील समतोल दिनचर्या मुळे माणसाच्या गरजा नेहमी पुऱ्या होत आहेत. अर्थात जिल्ह्यात दीड शतकांमध्ये माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गावर घाला घाला सुरू केला आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे हेही तितकच खरं आहे परंतु माणसाच्या आर्थिक विकासाबरोबर माणसाची बौद्धिक विकासही तितकाच झालेला आहे या बौद्धिक विकासाचा उपयोग निसर्गाशी समांतर किंवा समतोल साधत विकासाची व्याख्या आखली गेली तर निसर्गाचा ऱ्हास न होता शास्वत विकास साधता येईल ज्यामुळे निसर्गही अबाधित राहील आणि माणसाच्या गरजा भागतील.

 

साधी साधी उदाहरणे बघितली तर अगदी पूर्वापार पैसे जेव्हा चलनात नव्हते त्यावेळी वस्तूच्या बदली वस्तू असा व्यवहार चालायचा म्हणजे एखाद्याने तांदूळ दिली तर दुसरा समोरचा भाजी द्यायचा किंवा एखादा कोंबडी दिली तर दुसरा मांजर द्यायचा किंवा एखाद्याने जंगलातील काही वस्तू दिली तर त्या बदल्यात त्याला धान्य दिला जायचं अशा प्रकारचे व्यवहार त्या वेळी चालत असट. तसेच आजही निसर्ग जंगल माणसाला बरंच काही देत आहे आजही अतिशय दुर्गम भागांमध्ये माणसं निसर्गा वरती अवलंबून आहेत जंगलातील  जळाऊ लाकूड वनौषधी असतील किंवा इमारतीचे लाकूड साधी साधी उदाहरणे बघितली तर अगदी पूर्वापार पैसे जेव्हा चलनात नव्हते त्यावेळी वस्तूच्या बदली वस्तू असा व्यवहार चालायचा म्हणजे एखाद्याने तांदूळ दिली तर दुसरा समोरचा भाजी द्यायचा किंवा एखादा कोंबडी दिली तर दुसरा मांजर द्यायचा किंवा एखाद्याने जंगलातील काही वस्तू दिली तर त्या बदल्यात त्याला धान्य दिला जायचं अशा प्रकारचे व्यवहार त्या वेळी चालत असट. तसेच आजही निसर्ग जंगल माणसाला बरंच काही देत आहे आजही अतिशय दुर्गम भागांमध्ये माणसं निसर्गा वरती अवलंबून आहेत जंगलातील  जळाऊ लाकूड वनौषधी असतील किंवा इमारतीचे लाकूड यासारख्या गोष्टी आजही जंगलातून घेतल्या जातात दुर्गम भागातील लोकं आजही निसर्गाचा आदर करत आपल्याला हवे तितकेच जंगलातून आणत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील काही पांढरपेशा यांकडून मात्र जंगल ओरबाडला जात आहे. ज्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. वनविभागाने हेच ओळखून निसर्ग किंवा जंगलातून त्या जंगला जवळील गावांमध्ये शाश्वत रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन केली आहे या समिती अंतर्गत राखीव वनातील शिका काही तमालपत्र हरडा बेहडा गरबधी यासारखी जंगली उत्पादने स्थानिक ग्रामस्थ वनविभागाच्या मदतीने जंगलातून काढून लिलावासाठी बाजारात आणू शकतात यामुळे गावातील जंगल हे आपलेच आहे या जंगलातून आपल्याला उत्पन्न मिळते ही भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण होऊन ग्रामस्थ स्वतः या जंगलांच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी पुढे येतील त्या अनुषंगाने बरेच गावांमध्ये अशी काम आहे सुरू झालेली आहे यापूर्वीही ग्रामस्थ जंगलातून बऱ्याच गोष्टी घेत आलेले आहेत या बदल्यात त्यांनी देवराई ही संकल्पना आजही कायम ठेवली आहे देवाच्या नावाने राखलेले जंगल म्हणजे देवराई. आजही या जंगलामध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होत नाही किंवा शिकार होत नाही याठिकाणी मांस भक्षण केलं जात नाही अशा प्रकारे या 

Jungle dweller
आंबोली वन्य जीव

जंगलाचं पावित्र्य राखले जाते संपूर्ण कोकणपट्टी यासह सिंधुदुर्गात अशा देवराया अनेक आहेत आणि या देवराया निसर्गाच्या प्रकोपामुळे किंवा भीषण दुष्काळ वेळी इथल्या ग्रामस्थांना आधार देत आलेली आहे. छंद म्हणून बरेच लोक जंगलाचा दुरुपयोग किंवा जंगलातून आपल्याला हवे असलेले ओरबाडून घेत आहे परंतु त्या जंगलात जवळ राहणारे लोक मात्र आजही त्या जंगलांचा संगोपन करत आहे.

    केवळ जंगल वाचवा किंवा निसर्ग वाचवा म्हणून ओरडून चालणार नाही तर हे जंगल का वाचलं पाहिजे याची इत्थंभूत माहिती ग्रामस्थांना खेळीमेळीच्या वातावरणात दिली पाहिजे त्यातून रोजगार कशा प्रकारे निर्माण होतील हेही सांगितलं पाहिजे ग्रामीण कृषी निसर्ग पर्यटन असेल जंगलातून मिळणारी उत्पादने असतील निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल अशा प्रकारचे उपक्रम कार्यशाळा घेऊन ग्रामस्थांना जंगलाचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे सिंधुदुर्गातील जैवविविधता ही संपन्न आहे या ठिकाणी 250 हून अधिक पक्षी आढळतात 26 हून अधिक प्राणी आढळतात बावन प्रकारचे साप 27 प्रकारचे बेडूक हजारो बनवू औषधी अशी येथील विपुल समृद्ध जैवविविधता असताना या निसर्गाकडून आपल्याला काहीही न करता बरेच काही मिळू शकते केवळ गरज आहे ती आपला विकास साधत असताना तो या निसर्गाच्या साथीने शाश्वत रित्या साधला गेला पाहिजे तरच निसर्ग ही वाचेल आणि माणूसही वाचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!