सिंधुदुर्गातील लक्षणीय सुमुद्र किनारे

Spread the love

सतीश पाटणकर 

redi-beach

       सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी, तितकीच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी.. तासनतास लाटा पाहात बसले तरी कंटाळा येत नाही. नवीन येणारी प्रत्येक लाट आपल्याबरोबर नवीन स्वप्नेच जणू घेऊन येते. एकटयाने हा लाटांचा खेळ पाहात बसण्यासारखा आनंद नाही दुसरा. महाराष्ट्राच्या या अनमोल खजिन्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. समुद्र किनारा हा शेवटी सगळीकडे सारखाच – तो रेडीला पाहिला काय अन् रत्नागिरीला पाहिला काय! पण तसं नसतं. म्हणून तर शिरोडयाच्या सुरूच्या बनात बसून समुद्र जितका मोहक वाटतो, तितकाच तो विजयदुर्गच्या किल्ल्यातूनही वाटतो. त्याच्या पोटात जितकी अमर्याद संपत्ती दडली आहे, तितकेच त्याचे दर्शनही अमर्याद आनंददायी आहे.

कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी..

या संपूर्ण किनारपट्टीवर हा आनंद वेचण्याची ठिकाणे कोठे आहेत याची माहिती करून देण्याचा इथे अल्पसा प्रयत्न केलेला आहे. पायी किना-याने फिरणा-यां पासून गाडीने किना-यावर जाणा-यांपर्यंत सर्वांना तो मार्गदर्शक ठरावा हा हेतू. गोव्याच्या किना-याची सा-या जगाला माहिती आहे, पण अत्यंत प्रेक्षणीय असूनही महाराष्ट्राचा हा किनारा मात्र ब-याच अंशी दुर्लक्षितच राहीला आहे. सिंधुदुर्ग गोव्यापेक्षा काही वेगळा नाही, गोव्यातील नाईट लाईफ सोडली तर सिंधुदुर्ग अगदी गोवाच आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा असून देखील सिंधुदुर्गचा म्हणावा तास विकास झाला नाही. सिंधुदुर्गातील मोजके समुद्रकिनारे सोडले तर बाकीच्या समुद्र किनाऱ्याचा विकास झालेला नाही. सिंधुदुर्ग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा राज्यापेक्षा मोठा आहे. गोवा राज्याला १०३ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे त्या उलट सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे. अर्थातच सिंधुदुर्ग मध्ये असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांची संख्या एकंदरीत गोवा राज्यापेक्षा जास्त आहे.  

रेडी बीच

redi-beach

    रेडी गाव ऐतिहासिक पाश्र्वभूमीबरोबरच, लोह खनिजांच्या खाणीसाठीही प्रसिद्ध आहे. येथे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मंदिर भव्य असून त्यास प्रचंड मोठा सभामंडप आहे.  याच गावातील समुद्रकिनाऱ्याला लागूनच यशवंतगड नावाचा एक अपरिचित किल्ला आहे. पर्यटक मंडळी तर सोडाच, हौशी ट्रेकर्सही येथे फारसे फिरकत नाही.

       सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने खाडीच्या मुखाशी मोकळ्या ठिकाणी हा किल्ला बांधला. किल्ला चांगला ऐसपस असून तटाचा एकूण घेर अडीच किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. समुद्रसपाटीपासून तटाची उंची ३०मीटर पर्यंत आहे. १६६२ साली शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यास यशवंतगड असे नाव दिले. ढासळलेले बुरुज, दरवाजे वैभवशाली इतिहासाच्या खुणा पटवून देतात.

yashwantgad-fort

यशवंतगड किल्ला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!