तुम्ही या बीचवर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स देखील करू शकता. जेट स्कीईंग हे सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पॅराग्लायडींचा आनंद तुम्ही घेऊ शकता. या परदेशी मंडळींना बहुधा इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. काही हुशार स्थानिक कोकणी माणसांनी, प्रखर व्यावसायिकतेचे दर्शन घडवत, छोटी कॉटेजेस बांधून परदेशी पाहुण्यांच्या सोयीसाठी, चक्क रशियन भाषेमध्ये हॉटेलचे नाव व दर फलक लिहिल्याचे दिसले. तळ कोकणातील अशा सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व काही हजार किलोमीटर दूर असलेल्या परदेशी पर्यटकांनी आपल्या अगोदर ओळखले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.