Spread the love
bhogawe-beach-sindhudurg

भोगवे समुद्रकिनारा : अंतरराष्ट्रीय ब्लुफ्लॅग प्रमाणपत्र

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.. कारण वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ”पर्यावरण अभ्यास संस्था डेन्मार्क” या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. यात देशातील देशातील 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली. आणि यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश करण्यात आला.

 देवबागच्या संगम बीचवरून तुम्हाला भोगवे बीचचे दर्शन होते. असं तरी हा बीच वेंगुर्ले तालुक्यात येतो. पण पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर ओढलेला भोगवे बीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

    

Bhogawe-beach-resort-Rock
Bhogawe-beach-resort-Rock
bhogave-beach-sindhudurg-tourist-attraction

  तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात.म्हापण-पाट-परूळे-केळूस हा संपूर्ण रस्ता वळणावळणाचा असून नारळी-पोफळीच्या बागातून जातो. हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!