येवा, सिंधुदुर्ग नंबर वन आसा

Spread the love

दोन तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा घोषित करण्यात आले आहे. मुळातच स्वच्छता आणि टापटिप याबाबत चोख असलेल्या कोकणी माणसाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्राच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून कोकणातील चिमुकल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे.

       पाणीपुरवठा, उघड्यावर प्रातर्विधीपासून मुक्ती, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे केले गेलेले अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच सर्वेक्षण होते. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेतर्फे करण्यात आले. मुळातच निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या सिंधुदुर्गाला यामुळे देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळाले आहे. पण हा बहुमान असा सहज मिळालेला नाही. गेल्या तब्बल दीड-पावणेदोन दशकांच्या चळवळीतूनच हे साध्य झाले आहे. राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने १९९९ साली सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून सिंधुदुर्गात या स्वच्छता चळवळीची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांनी सातत्याने उत्तम कामगिरी करत विभागीय तसेच राज्य पातळीवर अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतरच्या काळात पर्यावरण संतुलित ग्राम योजना, निर्मल ग्राम योजना आदींच्या माध्यमातून सिंधुदुर्गाने आणि जिल्ह्यातील नागरिकांनी आपली चळवळ चालूच ठेवली. या सगळ्यातून मोठे काम झालेच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याला चालना मिळाली आणि देशातील सर्वाच स्वच्छ जिल्हा ठरला.
        ‘मुळात कोकणी माणूस स्वच्छता, नागरी जाणीवा याबाबत सजग असतो, आग्रही असतो. टापटिप, स्वच्छता हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे स्वच्छतेविषयक उपक्रमांना नागरिकांचा चांगलाच पाठिंबा मिळाला. लोकसहभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सर्वांच्या एकत्र प्रयत्नांमुळेच स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले,

      रत्नागिरीपासून वेगळा होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली, स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष सिंधुदुर्गकडे गेले आहे. त्यामुळे हा लहानसा जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येईल. पर्यटनाला चालना मिळाल्यास साहजिकच त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!