Spread the love

कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे.

कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव ‘हापूस आंब्या’साठी प्रसिद्ध आहे. कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र.

ऐतिहासिक आणि कोकणचा अजोड इतिहास सांगणारे कुणकेश्वरचे मंदिर, त्याच्या पायाशेजारी अखंड नाम जप करण्यात तल्लीन झालेला अरबी समुद्र, रुपेरी वाळू, भिरभिरणारे वारे हे सारे वातावरण हवेहवेसे वाटते. याला भौगोलिक आणि आध्यात्माची तेवढीच पार्श्वभूमी आहे. कुणकेश्वराचे महात्म्य कोकणच्या लोकांना माहितीच आहे. कोकण हे शिवभक्तांचे स्थान आहे. कोकणातील असे एकही गाव नाही जेथे शिवाचे मंदिर नाही. भले तर नावे वेगवेगळी आहेत. मात्र सर्वत्र शिवपिंडीच असते. यात कुणकेश्वराचे स्थान विशेष.. गावा-गावातील ग्रामदेवतांच्या तरंगांची महाशिवरात्रीला कुणकेश्वराच्या भेटीच्या निमित्ताने गावातून स्वारी निघते. या स्वारीमध्ये ग्रामस्थ जत्रेत सहभागी होतात. देवतांच्या निमित्ताने गाववासीय मजल दरमजल करत कुणकेश्वरमध्ये दाखल होतात. ग्रामदेवतांच्या तरंग स्वा-यांनी कुणकेश्वराचा समुद्रकिनारा भरून आणि भारूनही जातो. विठ्ठलाच्या भेटी निघालेल्या दिंडीप्रमाणेच हा उत्सव असतो. महाशिवरात्रीचा उत्सव आणि आमवास्येच्या पर्वावर स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येथे लाखो भाविकांची पावले पोहोचलेली असतात. ग्रामदैवत आणि कुणकेश्वराच्या भेटीचा हा योग अभूतपूर्व असतो. पूर्वी वाहतुकीची साधने मर्यादित होती. यामुळे ग्रामदेवतांच्या स्वारीबरोबर निघल्यानंतर

श्री क्षेत्र कुणकेश्वर

मजल दरमजल करत कुणकेश्वराच्या दर्शनास जाणे सोयीचे शिवाय सुरक्षितेचा प्रश्न नसायचा.? कुणकेश्वराच्या परिसरात मोठी जत्रा भरत असल्याने कृषीवलांच्या साहित्याबरोबरच गृहोपयोगी साहित्यांची मोठी उलाढाल होते. महाशिवरात्रीला येथे अखंड जागर सुरू असतो. अलीकडे यात्रेचे स्वरूप बदलले आहे.? मनोरंजनाची साधने वाढली आहेत. हौशी लोकांची संख्याही वाढते आहे. पण येथे येणारी अनुभूती विलक्षण आहे.

अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी.कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर.देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.

कोकणातल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांपैकी तळकोकणात, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गानं जरा जास्तच झुकतं माप दिलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून वेगळा झालेला हा जिल्हा निसर्गाच्या बाबतीत अगदी संपन्न आहे. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशा किल्ल्यांपासून अफाट समुद्रकिनाऱ्यापर्यंत या निसर्गाची संपत्ती आहे. या जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं. सिंधुदुर्गातलं कुणकेश्वर मंदिर हे त्यातलं असंच एक वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान. देवस्थान म्हटल्यावर आपल्याला भक्ती, श्रद्धा यांचीच आधी आठवण येते; पण कुणकेश्वर हे असं फक्त तेवढ्यासाठीच जावं, असं देवस्थान नाही. समुद्रकिनारी वसलेलं एक रम्य आणि निवांत ठिकाण आहे. किनाऱ्याला लागून असलेल्या थोड्याशा उंच भागावर बांधलेल्या या देवळाचा समुद्राकडचा भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित केलेला आहे. ऐन किनार्‍याशी असणार्‍या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे. रहस्यमय असा आहे. 

कुणकेश्वर देवस्थानाच्या निर्मितीचा संबंध थेट पांडवांशी जोडला जातो. अज्ञातवासात असताना पांडव इथून प्रवास करत होते. या भागात प्रतिकाशी निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी एका रात्रीत १०८ शिवलिंगं त्यांना तयार करायची होती. तशी तयारीसुद्धा त्यांनी केली होती; पण हे खरंच घडलं, तर तीर्थक्षेत्र काशीचं महत्त्व कमी होईल, म्हणून काशी विश्वेश्वरानंच कोंबड्याच्या रूपानं बांग दिली आणि पहाट झाली, असं समजून पांडवांनी काम अर्धवट थांबवलं, अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी त्यापैकी २१ शिवलिंगं पाहायला मिळतात. गेली कित्येक वर्षं समुद्राच्या पाण्यामध्ये झीज होत असतानाही ही शिवलिंगं टिकून आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

         कुणकेश्वर मंदिराच्या निर्मितीची आणखी एक दंतकथा बाराव्या शतकाशी संबंधित आहे. त्या काळात इराणची व्यापारी जहाजं या भागातल्या अरबी समुद्रातून जात. एकदा एका इराणी व्यापाऱ्याचं जहाज या भागातून जात असताना वादळात अडकलं. त्या व्यापाऱ्याला समुद्रकिनाऱ्याजवळच्या टेकडीवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्यानं देवाचा धावा केला आणि वादळ शांत झालं. जहाज किनाऱ्याला लागलं. त्याची या देवावर श्रद्धा बसली. त्यामुळे त्यानं तीन वर्षं मेहनत घेऊन या मंदिराची निर्मिती केली. इराणच्या शहाच्या कानावर ही बातमी गेल्यामुळे घाबरून त्या व्यापाऱ्याने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचंही सांगितलं जातं. इराणच्या व्यापाऱ्याची ही दंतकथा काल्पनिक असल्याचं या भागातल्या काही संशोधकांचं आणि माहीतगारांचं मत आहे. त्यांच्या मते, इस्लामी आणि अरबी हुकूमशहांच्या आक्रमणांमध्ये हे मंदिर उद्ध्वस्त होऊ नये, म्हणूनच या भागात कबर बांधण्यात आली, जेणेकरून हे केवळ हिंदू धर्माचं स्थळ वाटू नये. या युक्तीमुळेच त्या काळात हे सुंदर मंदिर आक्रमणातून टिकून राहिलं.

         प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदुंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करित होत्या त्या काळी एक मुस्लीम व्यक्तीकडुन हिंदु मंदिर कसे काय उभारण्यात आले. त्यामुळे हि दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती. त्यामुळे कुणकेश्वरच्या ईतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला.1960 च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकीत्सक दृष्टीने पाहणी केली. आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी ईमारत हि, हिंदु मंदिराची असुन आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानिशी दाखवून दिले. अशाप्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या ईतिहासातील सत्य परिस्थिती सर्वाँसमोर आणली. त्यानंतर कोँकणातील गावह्राटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिर्लेकर या अभ्यासकांनी ही याविषयी संशोधन केले असुन, “कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाय्राने बांधले नसुन हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. आणि थडगे समजले जाणारी वास्तू हि एक बाटवलेले शिवमंदिर आहे.” असा निष्कर्श सर्वानी मांडला आहे. कुणकेश्वर संदर्भात लिखीत ऐतिहासिक कागदपत्रे फारसे उपलब्ध नाहीत.     येथे नागदेवाच्या ताम्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. हा ताम्रपट ग्रँट जेकब या इंग्रज अधिकाय्राने शोधून काढला होता.”इ. स. 14व्या शतकात इंदुल (सध्याचे हिंदळे) नावाच्या गावात देवशर्मा नावाच्या ब्राम्हणाचे आगमन झाले येथील राजाने या ब्राम्हणाचा पुन्हा पुन्हा सत्कार केला. पुढे या ब्राम्हणास राजलक्ष्मी प्राप्त झाली व श्री कुणकेश्वराच्या कृपाशीर्वादाने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले” अशी नोंद या ताम्रपटात केलेली आहे. सन1436 सालच्या या ताम्रपटावरुन त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे वैभवाच्या शिखरावर तळपत असल्याचे दिसते.

          देवगडच्या दक्षिणेस २० कि.मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनार्‍यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असे स्थानिक लोक सांगतात. या मंदिराचे संपूर्ण काम अत्यंत कलात्मक असे आहे. अनेक वर्षे भाविक श्रद्धेने या मंदिराला भेट देत असतात. 

      मंदिराच्या कासवाकडील मंडपाच्या सभोवतालचे पुरातन कोरीव दगडी स्तंभ सर्वतोभद्र प्रकारातील जाळ्या, गाभाय्राच्या प्रवेशद्वाराचे शेषशायी विष्णुचे व दशावतारांचे भव्य कोरीव शिल्प, गाभाय्रात प्रवेश करावयाची कमलाकृती पायरी, तिच्या दोन्ही बाजुच्या सुबक सिंहाकृती, व्याळ, किर्तीमुखे, अश्वमुखे, नाग, सर्प, गरुड, हनुमंत यांसारखे असंख्य पौराणिक प्रसंगावरील शिल्पपट पाहता हे मंदिर 11व्या शतकांपूर्वीचे असल्याचे निश्चित करता येथे. गेल्या हजार-बाराशे वर्षातवारंवार झालेल्या जिर्णोद्धारामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात कालानुरुप बदल होत गेल्याचे स्पष्ट दिसते.अशा रितीने कुणकेश्वर मंदिराच्या बांधकामाशी अरब व्यापाय्राचा संबंध असल्याचे दाखवून देणारा एकही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांच्या कळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ 300 वर्षांपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते.

 

 

श्री क्षेत्र कुणकेश्वर

याच भागात आणखी काही मंदिरं पाहण्यासारखी आहेत. श्री देव नारायणाच्या मंदिरातली नारायणाची मूर्ती अतिशय दुर्मीळ पद्धतीची आहे. या मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. नीट पाहिल्यास ते लक्षात येतात. नारायण मंदिराच्या थोडं पुढे अलीकडच्या काळात बांधलेलं श्री गणपती मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराच्या पूर्वेला डोंगरउतारावर १९२० साली खोदकाम करताना एक गुहा सापडली. तिचं दार अडीच फूट रुंद आणि चार फूट उंचीचं आहे. ही गुहा जांभ्या दगडात कोरून काढलेली आहे. या गुहेत काळ्या पाषाणात कोरलेली रेखीव लेणी आहेत. त्यात शिवलिंग, नंदी आणि स्त्री-पुरुषांचे मुखवटे आहेत. त्याबद्दलही वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालं आहे आणि वेगवेगळे दावेही प्रचलित आहेत

कुणकेश्वर मंदिरापाशीच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर बागडण्याचा, डुंबण्याचा आनंदही घेता येतो, अर्थात सगळी काळजी घेऊन. मंदिराच्या परिसरातली संध्याकाळ अतिशय रम्य असते. आणखी थोडा वेळ हाताशी असेल, तर मालवण गाठून तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पोहोचावं. तारकर्ली हा कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी अतिशय समृद्ध आणि लोकप्रिय किनारा. इथं भरभरून निसर्गही आहे आणि साहसी खेळांचे अनेक प्रकारही. मालवणपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरचा अतिशय स्वच्छ आणि सुंदर किनारा म्हणून तारकर्ली प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात त्याची जरा जास्तच प्रसिद्धी झाली आहे. किनाऱ्याबरोबरच नारळी-पोफळींच्या बनांची सफरही या प्रवासात करता येते.

सागराच्या अखंड जपात कुणकेश्वरच्या तेजाने भारलेल्या भूमीत ‘ॐ नम: शिवाय..’ असा सूर घुमत आहे. तेजोमय दर्शन घेताना समुद्राची गाज त्या विश्वंभराची अमर्याद छाया तुमच्यावर आहे याची साक्ष क्षणोक्षणी देते. श्री क्षेत्र कुणकेश्वर धार्मिक पर्यटनासाठी देशविदेशातील अनेकांना साद घालत आहे. याच भूमीत कोकणचे वैशिष्टय़ असणा-या ग्रामदेवतांच्या गाठी-भेटी सुरू होतात. महाशिवरात्रीला तरंग स्वा-या हजारो भक्तांना घेऊन दाखल होतात. हे शिवरात्रीचे पर्व डोळ्याचे पारणे फेडणारे असते.  जे जे या भूमीत पोहोचले ते ते कुणकेश्वराकडे पुन्हा पुन्हा येत राहिले.     

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणार्‍या सर्व देवस्वार्‍या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षाँनी कुणकेश्वरच्या भेटीला येणार्‍या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणार्‍या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.   

ब्रिटीशकालीन दस्तऐवज असलेल्या बॉम्बे ग्यझेटमध्येही कुणकेश्वराचे पुढील प्रमाणे वर्णन आढळते. 1880 सालच्या बॉम्बे ग्यझेट मधील माहितीनुसार मंदिराविषयी खालील माहिती दिलेली आहे. “देवगड उपविभागात समुदकिनारी कुणकेश्वर गाव वसलेले आहे. या मंदिराचा पाया ग्रनाईट दगडाने बनविला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे. कोल्हापुरच्या राज्यप्रमुखांनी 1680 साली या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

Translate »
error: Content is protected !!