Banana-Ride

देवबाग

Spread the love

     मालवणपासून साधारण 9 किलोमीटरवर बसलेले देवबाग म्हणजे खरोखरच देवानेच बसवले असावे असे. कुसुमाग्रजांच्या कवितेचे मूर्तीमंत उदाहरण जणू. मानवाचे ध्येय आणि आसक्ती ही उत्तुंग आहे. समुद्राला मात्र किना-याचे बंधन आहे. प्रत्येक वर्षी पावसाळयात समुद्राचे पाणी सगळे गाव धुवून काढून कर्ली नदीत मिसळते. गावाचे अपरिमित नुकसान होते. पण तरीही वर्षानुवर्षे इथल्या माणसांनी पराभव पत्करला नाही. त्यांची विजीगिषु वृत्ती लोपलेली नाही. 

तारकर्ली बीचला लागूनच देवबाग हे छोटासा गाव आहे. तारकर्लीच्या प्रसिद्धतेमुळे देवबागचा उल्लेख तस होत नाही पण तारकर्ली बीच बरोबरच त्याला जोडले जाते. तारकर्लीप्रमाणे एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र देवबाग आहे, पण देवबागच वेगळेपण दडलंय हे खाडी आणि नदीच्या संगम स्थळामुळे. देवबागला तुम्ही वॉटर स्पोर्टच आनंद घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!