Devgad

Spread the love

श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे

देवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात दिर्बादेवी झाले.
श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात आयूधे म्हणून एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे. हे एक सुरक्षित मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.

पोखरबांव गणपती मंदिर

देवगड-आचरा-मालवण मार्गावर देवगड पासून 13 कि.मी. अंतरावर रस्त्याला लागूनच पोखरबांव येथे एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हल्ली तेथे भव्य देखणे मंदिर बांधले असून शेजारीच भलामोठा मंडप उभारला आहे. तेथे अनेक सोयी-सुविधा केल्या असल्यातरी तेथे रहाण्या-जेवणाची सोय नाही.

      सुंदर बगीचा केला आहे. विश्रांतीसाठी आणि भोजनासाठी दोन मंडप आहे. त्यापैकी एक कायम स्वरूपी तर एक तात्पुरता स्वरूपाचा आहे. तेथे बारामाही पाण्याचा झरा आहे. अतिशय रम्य असे हे नैसर्गिक आणि धार्मिक स्थळ आहे.

श्री लिंगेश्वर मंदिर, इळये   

देवगड-कुणकेश्वर मार्गावर देवगडपासून 14 कि.मी. अंतरावर आमराईत निसग्र सौंदर्याने नटलेले इळये नावाचे गांव आहे. हे गाव थोडे उंचावर असल्याने त्याला इळयेसडा असेही म्हणतात. येथून कुणकेश्वर उत्तम रस्ता आहे. हा रस्ता इळये गावातूनच जातो. या गावापासून जवळच पण हमरस्त्यापासून थोडं एका बाजूला निसर्गरम्य, सुंदर व शांत परिसरात शिवभक्ताचे श्रध्दा स्थान असलेलं श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे.

श्री लिंगेश्वर मंदिर, इळये   

देवगड-कुणकेश्वर मार्गावर देवगडपासून 14 कि.मी. अंतरावर आमराईत निसग्र सौंदर्याने नटलेले इळये नावाचे गांव आहे. हे गाव थोडे उंचावर असल्याने त्याला इळयेसडा असेही म्हणतात. येथून कुणकेश्वर उत्तम रस्ता आहे. हा रस्ता इळये गावातूनच जातो. या गावापासून जवळच पण हमरस्त्यापासून थोडं एका बाजूला निसर्गरम्य, सुंदर व शांत परिसरात शिवभक्ताचे श्रध्दा स्थान असलेलं श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे.
मंदिराच्या परिसरात पुरातन काळातील विहीर असून या विहीरीला वर्षभर पाणी असतं. या मंदिराच्या मागच्या बाजूला दोन फूट अंतरावर एक गुहेसारखे भुयार आहे. हे भुयार कुणकेश्वर मंदिरापर्यंत गेल्याचे सांगितले जाते. आजही काही भावीक भुयाराच्या मुखावरून श्री देव कुणकेश्वराची पूजा करतात व तेथून केलेली पूजा कुणकेश्वरापर्यंत पाहोचते,
येथील नयनरम्य परिसर आणि मंदिराचे प्राचीन सुबक बांधकाम पाहून येथे येणारा प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होतो. कलाकुसरीचा उत्तम नमुना असणारे हे धार्मिक स्थळ प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिले आहे

सैतवडे धबधबा

नांदगांव-देवगड मार्गावर देवगड पासून सुमारे 27 कि.मी. अंतरावर तोरसोहे फाटा आहे. तेथून सैतवडे धबधबा 3 कि.मी. अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता कच्चा आहे. तसेच याच मार्गावर नांदगांवपासून 13 कि.मी. अंतरावर शिरगांव आहे. तेथून हा धबधबा 6 कि.मी. अंतरावर आहे. येथून जवळच सैतवडे आणि पाडाघरवाडी अशी दोन गावे आहेत. म्हणून याला सैतवडे धबधबा किंवा पाडाघर धबधबा असे म्हणतात. जिल्हयाचा पर्यटन नकाशा तयार करताना या धबधब्याच्या आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. जवळ नदी पलीकडच्या निसर्गरम्य परिसरात श्री गिरावळदेवीचे मंदिर आहे.येथे भरपूर बारमाही पाणी आहे. उंच खडकामधून पडणारा हा धबधबा पर्यटकांना नेत्रसुख देणारा आहे. सभोवती असणा-या निसर्गरम्य परिसरामुळे या धबधब्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. पावसाळयात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या कालखंडात जरा जपूनच आनंद लुटला पाहिजे. पावसाळयात येथील सौंदर्य पहाणे हा एक सुखद अनुभव असतो. पावसाळयात वाहणा-या नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे डोंगर फोडला जाऊन त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. इतर वेळेला प्रवाह बेताचाच असतो. सतत वाहणा-या पाण्यामुळे काळया खडकात सुंदर तळे निर्माण झाले आहे. धबधब्यासमोरील नदीचे पात्र रूंद आणि कमी खोलीचे असल्यामुळे त्यात स्नानाचा आणि पोहण्याचाही आनंद लुटता येतो.येथील निसर्गरम्य परिसर पहाताच आपले भान हरपून जाते. तन-मनाला उल्हासित करणारा इथला गारवा अलौकिक शांतीचा, स्तब्धतेचा प्रत्यय देतो. येथे नेहमीच आसपासच्या शाळा वनभोजनासाठी येत असतात्ा. येथे चहापाणी, जेवण, रहाण्याची सोय नाही. मात्र स्वत:चे जेवण नेऊन किंवा जेवणाचे साहित्य नेऊन तेथे जेवण बनवून भोजन करून आनंद लुटण्यासारखे हे ठिकाण आहे.

विजयदुर्ग बंदर

विजयदुर्ग हे संपूर्ण कोकण किनारपट््टीवर एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या आणि मराठयाच्या काध्हात या बंदरात फार मोठी वर्दळ होती. सुरक्षित आणि खोल वाघोटन खाडीमुळे गिर्ये गोदी आणि वाघोटण गोदी यांचा मालवाहतुकीचा उपयोग करून घेतला जात होता. पूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी देवगड प्रमाणेच विजयदुर्ग बंदरातही जाता येता थांबत असे. परंतु मागील 20- 25 वर्षापासून या बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची इतर साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या मानाने

मालवाहतूक बरीच कमी झाली आहे.

 सध्या या बंदरातून कोल्हापूर भागातील साखर कारखान्यातील लाखो टन ऊसाची मळी निर्यात होत आहे. शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज प्र.लि. या कंपनीशी करार केला आहे. या बंदरासाठी हजारो कोटी हजारांची गुंतवणूक होणार असून हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो हाताळला जाणार आहे.

गिर्ये गोदी

Girye Godi

विजयदुर्ग-तळेरे मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून 27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या वाडातर, मुंबरी खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती
शिवाजी महाराजांनी बांणली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती.

   साधारणपणे मराठ्यांची जहाजे 20 ते 150 टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता 500 टनी जहाजांची होती. सुमारे 106 मी. लांब आणि 70 मी. रूंदीची ही गोदी उत्तराभ्सिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार, संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.

ब्रिटीशकालीन (मराठ्यांचा) बंगला, वाघोटन   

तळेरे5विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून 24 कि.मी. अंतरावर वाघोटन गाव आहे. विजयदुर्ग-वाघोटन खाडी, वाघोटन गोदी, हिरव्यागार वनराइ््रने सजलेल्या आंब्यांच्या बाबा, कोकणातील सर्वात मोठया आणि दणकट चि-यांचा खाण व्यवसास या बरोबरच या गावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे येथील ब्रिटीश कालीन (मराठ्यांचा बंगला) होय.
सुमारे 165 वर्षापूर्वी बांधलेल्या आणि स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बंगल्याची निर्मिती ब्रिटीशांनी अटक केलेल्या थिबा राजाला सन्मानाने ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी केले होती. एकूण 13 गोल अाणि चौकोनी आकाराचे अजस्र खांब, भव्य कमान्या यातून साकारलेल्या या बंगल्याला उत्कृष्ट सागवानी लाकूड वापरेलेले आहे. ब्रिटीशकालीन आठ हापूस आंब्यांची झाडे अद्यापही आहेत. येथे त्याकाळीतील विहीर, पडझड झालेला कैदखाना, घोडयांच्या पागा आहेत.

          हा ऐतिहासिक बंगला इ.स. 1932 साली होमोओपॅथिक डॉ. माधव कृष्णा मराठे यांनी लिलावात घेतला. या बंगल्यात आजही त्यांच्या औषधे बनविण्याच्या आणि साठवणीच्या वस्तू तसेच औषधोपचार व धार्मिक पुस्तकांचा संग्रह देखरेख करणा-यांनी सांभाळला आहे. दि. 15 डिसेंबर 1994 रोजी डॉ. मराठे यांचे निधन झाले त्यांनेतर त्यांचे पुत्र शरद मराठे आणि विद्या उत्तम मुधोळकर यांनी या वास्तूचा आधि वास्तूचा सांभाळ व्हावा म्हणून इ.स. 1995 साली कॅप्टन पी. पेरीग नायगम (त्यांना येथील लोक अण्णा म्हणतात) व त्यांचे चार मदतनीस यांची नेमणूक केली आहे. ही मंडळी येथे भेट देणा-यांना माहिती सांगतात. सध्या येथे 20एकर क्षेत्रात 350 आंब्याची झाडे आहेत. याच बागेत माधव मराठे, कमलाबाई मराठे, अक्का मराठे, कृष्णा मराठे यांच्या समाधी आहेत. पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या वाघोटनाला मिळालेला हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच होय.

वाघोटन गोदी

     देवगड पासून सुमारे 29 कि.मी. अंतरावर तळेरे-विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून 24 कि.मी. अंतरावर ब्रिटिश कालीन सुप्रसिध्द वाघोटन गोदी आहे. गिर्ये गोदी प्रमाणे येथील रचना असून ही गोदी ब्रिटीश काळात फार उपयुक्त होती. ब्रिटिशनौदलाच्या यशस्वीतेत वाघोटन गोदीने भर घातली आहे. ही कोकणच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. डोंगरमाथ्यावरून वाघोटन गोदी, वाघोटन खाडी, हिरवेगार डोंगर पहाण्यासारखे आहेत.

मणचे धबधबा

देवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून 20 कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून 5 कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून 35 कि.मी. अंतर आहे.   

     हा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे 300 फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. हा संपूर्ण परिसरच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे.  

   या धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.
पर्यटकांना भुरळ घालणारे हे ठिकाण असले तरी दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे हे पर्यटनस्थळ जिल्हयांच्या पर्यटन स्थळांपासून अद्यापही दूर आहे.

श्री दत्त मंदिर, पाटगांव

विजयदुर्ग-तळरे महामार्गावर विजयादुर्गापासून 18 कि.मी. अंतरावर हे दत्त मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रसिध्द यात्रा स्थळापैकी हे एक मंदिर आहे.

     हे दत्त मंदिर रस्त्यालगतच्या उंच टेकडीवर असून दरवर्षी येथे दत्त जयंती मोठया प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. यात्रे दिवशी संपूर्ण सिंधूदुर्ग जिल्हयातून मोठया प्रमाणात भाविक येतात. यात्रेच्या काळात येथे विशेष सुविधा नसल्या तरी पुरातन मंदीर पहाण्यासारखे आहे.

बाळशास्री जांभेकर स्मारक, पोंभुर्ले

 

दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे स्मारक, पोंभुर्ले विजयदुर्ग-तरेळे मार्गावर तरळयापासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर पोंभुर्ले फाटा आहे. तेथून 3 कि.मी. अंतरावर वाघोटण खाडीच्या काठावर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पण कार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांचे स्मारक आहे.

   आचार्य जांभेकर यांचे बालपण पोंभुर्ले येथे गेले. त्यांना 14 भाषा अवगत होत्या. विविध विषयांवर त्यांनी 13 ग्रंथ लिहिले आहेत. जस्टीस ऑफ पीस ही पदवी देऊन ब्रिटीशांनी त्यांचा सन्मान केला होता. दि. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबई येथून मराठी-इंग्रजी संमीश्र दर्पण पाक्षिक आणि दिनांक 10 मे 1840 रोजी मराठीतले पहिले दिग्दर्शक मासिक सुरू केले. जांभेकर यांचे दिनांक 17 मे 1846 रोजी निधन झाले.


त्यांचे स्मारक असलेले पोंभुर्ले येथील ठिकाण एक सुंदर देखणे सभागृह आहे त्या ठिकाणी जांभेकरांचा ब्राँझचा अर्धपुतळा आहे. तेथे त्यांच्या चरित्राची आणि कार्याची माहिती आधुनिक पध्दतीने चित्रीत केली आहे. आत भिंतीवर दर्पण आणि दिग्दर्शन च्या पहिल्या अंकाच्या मुखपष्ठाचे फोटो, चित्रे, जांभेकरांचे काही लेख, त्यांचे हस्ताक्षरातील लेख लावण्यात आले आहेत. बहुतेक त्यांची सर्व पुस्तकेही तेथे आहेत. आता तेथे जांभेकर ग्रंथालय, अतिथीगृह, उद्यान करण्याचा समितीचा मानस आहे.
आता तेथे नियमितपणे दि. 06 जानेवारी रोजी पत्रकार दिन समारंभ व राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण सोहळा आणि 17 मे रोजी दर्पणकारांच्या पुण्यातिथीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम होत असतो.
सध्या सर्व ठिकाणचे सर्व राज्यस्तरीय नागरीक आणि पर्यटक भेट देत आहेत.

Translate »
error: Content is protected !!