Gajabadevi Mandir

श्री गजबादेवी मंदीर, मिठबांव-तांबळडेग

Spread the love

देवगडपासून 30 कि.मी. असलेल्या मिठगांवपासून 3 कि.मी. अंतरावर एका टेकडीवर श्री गजबादेवी मंदिर आहे. येथून तांबळडेग 1 कि.मी. आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, अतिशय विशाल व रम्य किनारपट्टी लाभलेल्या टेकडीवर अतिशय देखणे असे हे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्यस्थानाचा जीर्णोध्दार शालिवाहन शके 1842 रौद्र नाम संवत्सर माघ शुध्द एकादशी शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 1921 रोजी फाटक-मिराशी या गावकरी मंडळींनी केला येथे प्रतिवर्षी 18 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते.या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दांडगाईदेवीचे एक छोटे मंदिर असून समोर भव्य कमान आणि एक आकर्षक दीपमाळ आहे. दीपमाळेवर ध्वज आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.शेजारीच रम्य तांबळडेग बीच आहे. मंदिर परिसरातून दिसणारा रम्य सागर किनारा, सुरूचे बन, निळाशार अरबी समुद्र आणि सूयर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे आहे. पायथ्याशी सपाट कातळ पसरलेले असून त्यात जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. सायंकाळी 5 वाजल्यानंतर येथे भेट देणे उत्तम. मंदिराच्या जवळपास गाडीने जाता येते.

श्री सिद्धेश्वर मंदिर, साळशी

नांदगांव-देवगड मार्गावरील नांदगावपासून 13 किमी. अंतरावर आणि देवगड बंदरापासून 27 किमी. अंतरावर शिरगांव आहे. येथून साळशी हे गांव 6 किमी. अंतरावर आहे. हे एक ऐतिहासिक, निसर्गरम्य, आणि इनाम गांव आहे. सुमारे 300 वर्षांपूवर्भ् पाटण महाल, कुडाळ महाल प्रमाणे साळस महाल प्रसिध्द होता. येथे जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.


येथील एस.टी. बस स्थानकानजिकच सुप्रसिध्द ऐतिहासिक, श्री देव सिद्धेश्वर-पावणाईची मंदिरे आहेत. ती पूर्वाभिमूख आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही शिव मंदिरात नसेल एवढी मोठी नंदीची मूत्ार्ी या मंदिरासमोर आहे. या मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. येथे अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या पावणाई देवीच्या अधिपत्याखाली एकूण 84 खेडी येतात. या मंदिरास दिलेल्या प्राचीन सनदांचा अभ्यास केला असता साळशी गावचे प्रशासन या देवालयांशी केंद्रीत झाल्याचे आढळते. आजही या देवलयांचा कारभार सनदांप्रमाणे चालतो. ह्या सनदा इंग्रजी व मोडी भाषेत आहेत. यामुहे ब्रिटिशकालीन आणि स्ांस्थान कालीन अशा प्रशासनचा एक वेगळा नमुना आपणास पहावयास मिळतो.या गावाच्या चारबाजूस असलेल्या हिरव्यागर्द दाट जंगलातील वनराई, वा-याने वेळूच्या बनातून येणारे संगीत, बारमाही वाहणारे निर्मळ व शुध्द पाणी, दाट जंगलात मनसोक्त लपाछपीचा खेळ खेळणारे नानविध पशु-पक्षी, हिरव्या झाडीत निळे पिसारे फुलवून नाचणारे मोर, 100 वर्षांपूर्वीचे मोठाले वृक्ष पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.येथून 2/3 किमी. अंतरावर तेंडली हे घनदाट अरण्या आहे. येथे बिबट्या, वाघ, तरस, कोल्हे, सांबर, भेकर, रानडुककर, साळींदर, ससे , शेकरू, घोरपड, माकडे इत्यादी प्राणी तसेच हिरवा राघू, रानमैना, कवडा, लाव्हा, रानकोंबडी, घार, लांब मानेचे कावळे, गरूड, धनेश (हॉर्न बिल) इत्यादी पक्षी विपुल प्रमाणात आहेत. सध्या दुर्मिळ होत असलेला धनेश येथे आढळतो.साळशी गावापासून 2 किमी. अंतरावर ऐतिहासिक किल्ला सदानंदगड आहे. शिलाहार भोज राजाच्या साम्राज्यात इ.स. 1100 ते 1200 दरम्यान किंवा विजयनगरच्या राजांकडून उभारलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला असावा. येथे एक छोटे तळे आहे. गडावरून दिसणारी नैसर्गिक शोभा अवर्णनीय आहे. गडावर पायवाटेने जावे लागते.

Translate »
error: Content is protected !!