Spread the love
Kondura-beach-Sindhudurg

कोंडुरा समुद्र किनारा

वेंगुर्ला मालवण या सागरी महामार्गापासून ३/४ किलोमीटर आत ‘कोंडुरा’ आहे. वेंगुर्ल्यापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेले हे एक अत्यंत रमणीय ठिकाण. किना-यावरून खाली खोल खोल उतरण. नारळी-पोफळीच्या बागेतून तुम्ही एकदम किना-यावरच जाता. समोर विस्तीर्ण समुद्र. पाठीमागे नारळी-पोफळीच्या बागा- त्या बागेतून नेहमी वाहणारा गोडया पाण्याचा झरा- झाडीमध्ये लपलेले लिंगेश्वराचे देऊळ!

अत्यंत रमणीय आणि चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीसारखेच गूढ. किना-यावरून दक्षिणेकडे थोडेसे चालत गेले की, प्रचंड दगडामध्ये समुद्राने केलेले ‘कोरीव काम’ पाहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी जमेल त्या ठिकाणी दगड फोडून आत विवर बनवले आहेत. त्यात आत खोलवर लाट गेल्यानंतर प्रचंड गूढ आवाज यायला लागतो. मात्र दगडावरून फारच सांभाळून जावे लागते. लाटांच्या मा-याने दगड इतके अणुकुचीदार आणि धारदार बनले आहेत की, पाय कापूनच निघावा. 

1 thought on “कोंडुरा बीच”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!