कोकण पर्यटन धोक्यात

Spread the love

        कोकणातील पर्यटन हे जलक्रीडा व इतर साहस पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात चालते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी जलक्रीडा व्यवसायांसाठी लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. या कर्जातुन अनेक बेरोजगारांनी व्यवसाय सुरु केला आहे. कोरोनामुळे आज व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कर्जाचे हप्ते भरणे व जलक्रीडा बोटी व इतर साहित्यांची देखभाल दुरुस्ती करावी लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉटेलमध्ये राहणारे पर्यटक जलक्रीडांसाठी एक ते दोन दिवस थांबतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनातुन मिळणारा महसुल कमी होऊन गोव्यामधील जलक्रीड़ा पर्यटनासाठी सर्व पर्यटक गोव्यामध्ये जात असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे.

   ‘कोरोनामुळे बसलेली प्रवासाची धास्ती दूर झाल्याशिवाय पर्यटन व्यवसाय रुळावर येणार नाही'”ट्रॅव्हल इंडस्ट्री मुळातच प्रवासाशी संबंधित आहे आणि आता कोरोनामुळे तोच बंद झाला आहे. टूर मॅनेजरचं काम हे पर्यटकांसोबत फिरणं हे आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ असा ऑप्शनच त्यांच्याकडे नाहीये. कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक परिणामही समोर येत आहेत. या व्हायरसमुळे सगळं कोकण ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसायांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या इंडस्ट्रींपैकी एक म्हणजे पर्यटन आणि दुसरा हॉटेल व्यवसाय. सरकारच्या बंधनामुळे आज कोकणातील हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत. पार्सल सेवेने धंदा होत नाही. शिवाय रात्रौच्या पार्सल सेवेची वेळ अकरा वाजेपर्यंत करायला हवी, ही हॉटेलव्यावसायिकांची मागणी रास्त आहे.सोशल डिस्टंसिंग पळून हॉटेलात बसण्याची परवानगी हवी. आधीच मेटाकुटीला आलेला हा व्यवसायही कायमचा बंद पडेल आणि यातून अनेक कामगारांना रस्त्यावर यावे लागेल अशी भीती आज हॉटेल व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. सरकारने या बाबत सकारात्मक निर्णय घेण्ययाची गरज आहे..

      आज पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व संपून लोक पुन्हा प्रवासाला कधी करणार याबद्दलच्या अनिश्चिततेनंही या ट्रॅव्हल इंडस्ट्रीला ग्रासलं आहे.”कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरणार असेल तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार ज्यापद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. पुढचं किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका आहे.”

    एप्रिल, मे हा पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. या काळात सर्वाधिक बुकिंग होतात. लॉकडाऊनमुळे हाच सीझन वाया गेला. याचा फटका जसा पर्यटन कंपन्यांना बसला आहे, तसाच पर्यटकांनाही बसला.”लोक प्रवासाचं बुकिंग जवळपास वर्षभर आधी करतात. या प्रवासाची पॅकेजेसही असतात. ट्रॅव्हल कंपन्यांकडून या सीझनच्या बुकिंगसाठी वापरलेले पैसे तुम्ही पुढे वापरू शकता, असं सांगितलं जात आहे. पण पुढे म्हणजे कधी? इथे आता उद्याचीच शाश्वती नाहीये. त्यामुळे लोकांना रिफंडच हवा आहेकोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी व्हायला लागली होती.

एप्रिलपर्यंत पर्यटनाचा सीझन असतो, पण हा सीझनच वाया गेला. आणि आता किमान एक ते दीड वर्ष परिस्थिती सुधारणार नाही. लोक प्रवासाला घाबरले आहेत, त्यामुळे किती पर्यटक येतील, हे सांगता येत नाही. पर्यटन एक साखळी आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्स, गाईड, छोटे दुकानदार असे अनेक जण असतात. या सगळ्यांच्याच रोजगारावर आता कुऱ्हाड आली आहे, कोरोनामुळे डिसेंबरपर्यंत परदेश प्रवास सुरू होईल की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. पण किमान सरकारनं या व्यवसायाला थोड्या सवलती दिल्या तरच हा व्यवसाय टिकेल.

   पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली कोकणची किनारपट्टी ओस पडली आहे. धार्मिक स्थळं बंद असल्यानं तीर्थक्षेत्रावर आधारलेली अर्थव्यवस्थादेखील संकटात आहे.पुढचे काही महिने पर्यटन व्यवसायासाठी वाईट असणार.कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी अद्याप बुकिंग सुरू केलेली नाही.पर्यटनयाविषयी आताच काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. गेल्या काही वर्षात ट्रॅव्हल अँड टूरिझम हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला होता. पण आता कोरोनामुळे प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लोक लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे लोकांच्या हातातला पैसा कमी होईल. त्यामुळे बजेट ट्रॅव्हलला प्राधान्य दिलं जाईल, या परिस्थितीत पर्यटन व्यवसायाला आर्थिक तोटा होणारच आहे. ट्रॅव्हल आणि एव्हिएशन इंडस्ट्री या मुळातच प्रॉफिट कमावणारे व्यवसाय नाहीयेत, त्यांचा बिझनेस व्हॉल्यूमवर अवलंबून असतो. पर्यटन व्यवसायात संघटित क्षेत्रातल्या नुकसानाची आकडेवारी आपल्याला मिळेल, पण या इंडस्ट्रीमध्ये असंघटित लोकांची संख्या खूप अधिक आहे.

मात्र, हेही खरंय की, आजच्या स्थितीत सर्वाधिक फटका कुठल्या क्षेत्राला बसला असेल, तर पर्यटन क्षेत्राला बसला आहे.