कविवर्य श्री मंगेश पाडगावकरांची शाळा

Spread the love
mangesh-padgaonkars-school
कविवर्य श्री मंगेश पाठगावकर

कविवर्य श्री मंगेश पाडगांवकर

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला,  येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

 • सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२४-११-२००८)

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता

 • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
 • अफाट आकाश
 • असा बेभान हा वारा
 • आतां उजाडेल
 • आम्लेट
 • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
 • दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
 • नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
 • प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
 • फूल ठेवूनि गेले
 • मी आनंदयात्री
 • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
 • सलाम
 • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
 • सांगा कसं जगायचं
 • सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
 • टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले

पापड कविता

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता ‘लिज्जत’ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, ‘आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?’ पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बॅंक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.संदर्भ हवा ]

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पुरस्कार आणि सन्मान


साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) : सलाम या कवितासंग्रहासाठी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२४-११-२००८)
पद्मभूषण पुरस्कार[१] (इ.स. २०१३)
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (इ.स. २०१३)
मुंबईतील जी-दक्षिण विभागात असलेल्या जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाला जोडणाऱ्या नाक्यावरील चौकास मंगेश पाडगावकर चौक असे नाव देण्यात आले आहे.
* त्यांच्या नावाने मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार दिला जातो.

काव्यवाचन

साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच.

वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.

इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे

Translate »
error: Content is protected !!