mochemad

मोचेमाड किनारा

Spread the love

शिरोडयापासून ५/६ किलोमीटरवर असलेला एक विस्तीर्ण किनारा. या किना-यावर ‘सागरतीर्थ’ हे तंबू निवास आहे. उजवीकडील डोंगराच्या माथ्यावरून वेंगुर्ल्याचे दर्शन होते.अत्यंत समृध्द असा निसर्ग असूनही भौगोलिक परिस्थितीमुळे इथे प्रचंड दारिद्रय नांदायचे. त्यामुळे मुंबईच्या मनी-ऑर्डरवरच चरितार्थ चालायचा. मात्र आता ही परिस्थिती बदलायला लागली आहे. हापूस आंब्याने जगभरात आपला नाव-लौकिक राखला आहे, आणि त्याचबरोबर कोकणी माणसाचे दैन्य दूर करायला हातभारही लावला आहे. फलोत्पादनामध्ये झालेल्या नवनवीन प्रयोगांची मधुर फळे, या माणसांना आता चाखायला मिळू लागली आहेत. फळावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आता सुरू झाले आहेत.

          तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात.

    म्हापण-पाट-परूळे-केळूस हा संपूर्ण रस्ता वळणावळणाचा असून नारळी-पोफळीच्या बागातून जातो. हा प्रवास कधीच संपू नये असे वाटते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!