श्री देवी भैराई मंदिर – मोंड – देवगड

Spread the love

श्री देवी भैराई मंदिर - मोंड - देवगड

मोंड गावची श्री. देवी भैराई.
मोंड गावच्या माळरानावर वसलेली माऊली श्री. भैराई देवी नवसाला पावणारी म्हणून तिची सर्वदूर ख्याती पसरली आहे. मोंड – वाघोटण मार्गावर देवगड तालुक्यातील एका टोकाला खाडी पलिकडे हे देवीचे पुरातन मंदिर आहे. मोंड गावावर निसर्गाने सृष्टी सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. खारेपाटण – कोर्ले – मुटाट – सौंदाळे – पडेल – पाटगांव – वाघोटण – वैभववाडी व तरेळे आदी गावांना जोडणा-या प्रमुख संगमावर मोंड गावापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर हे मंदिर वसले आहे. अतिशय निसर्ग संपन्न असे सडा – माळरान लाभल्याने पर्यटन स्थळ म्हणून

 नावारूपास येत आहे. मंदिराचे बांधकाम ऐतिहासिक वारसा दर्शवते. मंदिर गाभा-यातएक फुट खाली जमिनीत पाषाण असलेली देवी सुबक मुर्ती मन प्रसन्न करते. बाजूलाच देवीचे तरंग, पुरातन समई, विविध वाद्ये यामुळे विलोभनीय दृश्य आणि शांत वातावरण ही येथील वैशिष्टये आहेत. पूर्वी यामंदिर परिसरात घनदाट वनराई होती. बाजूलाच बारमाई पाणी देणारी विहीर आहे. कालांतराने वनराई तोडण्यात आली. सध्या मंदिराचे बांधकाम टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. प्राचीन कलाकृतींचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान आहे. भैराई देवीला मोंड गावाची आई असे संबोधले जाते. ती कातळावर जाऊन बैसली. तीची अनेक रूपे आहेत. पहिली माय भवानीच्या रूपातील जुगाई, दुसरी सिंहासनी रूपातील नवलाई, तिसरी लेकरांवर दृष्टी ठेवणारी भैराई म्हणून भाविक भक्तांना ती दर्शन देते. मंदिर परिसरात पुरातन मंदिरांच्या वास्तु अनेक आहेत. श्री. देव अनुभव, श्री. देव ब्राम्हण, समोरच श्री. रामेश्वर, भावई तसेच लेकरांचे रक्षण करणारा बारापाचाचा चौचार विविध देवतांचे मंदिरे बाजूलाच वसली आहेत.
मंदिरापासून १ कि. मी. अंतरावर ‘नंदीची घाटी’ म्हणून ओळख असलेले ठिकाण आहे. येथे एक पुरातन वटवृक्ष आहे. त्याच्या भोवती चौथरा आहे.या चौथा-यावर एक लहानशी संगमरवरी पाटी आहे. त्यामुळे हा चौथरा केव्हा बांधला याची कल्पना येते. प्रिवर्षी याठिकाणी दसरा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. माहेर वाशिणी व सासर वाशिणी, अबालवृद्ध भाविक येथे येतात. नवस बोलतात व नवस फेडतात. दसरोत्सवातील हे दोन दिवस जत्रा भरते. यावेळी देवस्वा-या रयतेसह मंदिर प्रदिक्षणा घालतात. असा अनोखा संगम पाहाय़वयास मिळतो.

Translate »
error: Content is protected !!