श्री ब्राह्मणदेव सुकळवाड

Spread the love
Shree-Brahmandev-Sukalwad

सुकळवाड येथील कसाल मालवण हमरस्त्यानजीकच श्री ब्राह्मणदेव मंदिर आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्री ब्राह्मणदेव  कुठूनही नवस केला तरी  नवसाला पावणारा देव म्हणूनही प्रसिद्ध आहे.

या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कुठल्याही जाती-धर्माच्या व्यक्तीना या मंदिरात खऱ्या अर्थाने मुक्त प्रवेश असून, परमेश्वराच्या थेट चरणांशी आपलं साकडं भक्ताला या देवळात घालता येतं.

कार्यक्रम

जत्रा- मार्गशीर्ष कृष्णपक्ष  द्वितीया या दिवशी वार्षिक जत्रोत्सव होतो. वार्षिक जात्रोस्तवाचे वेळेचं जिल्हास्तरीय क्रिकेटचे आयोजन गेली वर्षें ३८ केले तसेच लहान मुलांसाठी सुद्धा याठिकाणी मुलांच्या कलागुणांना ववदेण्यसाठी वेगवेगळ्या शर्यती, शालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते.

देवता पूजना बरोबरच क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण, व पार्सेकर दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग ही खास वैशिष्ट्ये.

हरिनाम सप्ताह= सर्वसाधारण पणे फेब्रुवारी महिन्यात असतो. श्री ब्राह्मणदेव कार्यकारिणी मंडळ बैठकीत ठरविण्यात येतो.

जिल्हास्तरीय चक्री भजन स्पर्धा हे खास आकर्षण. आजपर्यंत जवळजवळ सर्वच नामवंत भजनी बुवा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.

या कार्यक्रमाच्या आयोजनाची वाखाणणी अनेक नामवंतांनी केलेली आहे.

वार्षिक सार्वजनिक सत्यनारायण पूजा व  तीर्थ्प्रसाद = मे महिना.

प्रत्येक वर्षी गाजलेली, नामवंत दशावतारी मंडळांची , सिलेकटीव दशावतारी नाटके साग चार ते पाच दिवस आयोजित केली जातात.

समाराधना= बाजारपेठ राहिवाश्यांतर्फे महाप्रसाद समाराधना कार्यक्रम प्रतिवर्षी उत्साहात पार पाडला जातो.

Shree-Brahmandev-Sukalwad
Translate »
error: Content is protected !!