Spread the love
श्री देवी भगवती, धामापूर

श्री देवी भगवती, धामापूर

धामापूर गावाचा ‘सहम्यपूर’ असा उल्लेख बदामी येथील चालुक्य सम्राट विजयादित्य याच्या नेरूर गावच्या शके ६२२ (इ.स.७००) च्या ताम्रपटलिखित दानपत्रात मिळतो.
धामापूर येथील तलावाचा बांध प्रसिद्ध असून तो इ.स १५३० मध्ये बांधला आहे.
जवळजवळ 125 एकर क्षेत्रफळ असलेला हा मातीचा बंधारा धमापुर चे मंडलिक श्री नागेश देसाई ह्यांच्या पुढाकाराने गावकर्‍यांनी बांधला. अंदाजे 64 ओढे आणि झरे मिळून तयार झालेल्या ह्या तलावात भूर्क्याचा झरा हा सर्वात मोठा असून तो कालसे आणि धामापुर ह्या दोन गावातून वाहतो. ह्या बंधाऱ्याचे वैशिष्टय़ हेच की हा बंधारा दोन टेकड्यांच्या मध्ये तयार झाला असून त्याला बांध घालणारी भिंत ११मीटर उंचीची असून लांबी 271 मीटर आहे. ह्या चे पाणी दोन्ही गावांना पिण्यासाठी वापरले जाते. तसेच नैसर्गिक उंचीचा कल्पकतेने उपयोग करून ह्या पाण्याचा शेतीसाठी सुद्धा उपयोग होतो. पुर्णपणे नैसर्गिक गोष्टी वापरून तयार केलेली भिंत जमिनींची धूप सुद्धा थांबविते. ह्याच्या एका बाजूला भगवती देवीचे मंदिर असून दुसर्‍या बाजूला पाणी वाहून जाण्याचा मार्ग केला आहे. जवळजवळ 328 हेक्टर जमिनीचे सिंचन ह्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे शक्य होते त्यातील 21 परसेंट भूभाग जंगलाचा असून 72 टक्के भूभाग शेतीचा आहे. पुढे ह्याचे पाणी कर्ली नदीला जाऊन मिळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुना असा बंधारा कुडाळ आणि मालवण ह्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे. ह्या बंधाऱ्या ला UNESCO ने हेरिटेज साइट म्हणुन घोषित केले असून WHIS (World Heritage Irrigation Structure) असे प्रमाणित केले आहे. धामापुर तळ्या च्या परिसरात 193 वनस्पति आणि 247 जीव प्राणी ह्यांची नोंद झाली आहे.

अँड.नकुल पार्सेकर,सावंतवाडी 

error: Content is protected !!