श्री भवानी मंदिर

Spread the love
श्री भवानी मातेचं मंदिर

                    श्री. भवानी मातेचं मंदिर – किल्ले विजयदुर्ग – देवगड. छत्रपती शिवरायांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो परकियांकडून जिंकून घेतला हे ओळखायचं झाल्यास काही गोष्टीतून ते आपल्या लक्षात येते. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारूतीचं मंदिर, गोमुख बांधणीचा दरवाजा आणि किल्ल्यामध्ये असलेलं भवानी मातेचं मंदिर ! या तिन्ही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. छत्रपतींनी विजयदुर्ग किल्ला जिंकल्यावर किल्ल्यामध्ये बांधलेले भवानी मातेचं मंदिर मराठे वीरांना नेहमीच स्फूर्ती देत आलं. सन १६०० मध्ये शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आजही या मंदिरात पाहायला मिळते. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास एेकताना मराठ्यांच्या अंगात वीरश्री निर्माण करून शत्रूचा पाडावा करण्यास स्फूर्ती देणा-या या देवतेचं तत्कालीन आठवण करून देणारं मंदिर व्हावं अशी सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांची इच्छा आहे.

Translate »
error: Content is protected !!