Shree Hanuman Wada

देवगड – वाडातर गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर….

Spread the love

लक्ष्मण वाडेकर 

निसर्गरम्य कोकणाला ७२० कि. मी. लांबीचा सागरी प्रदेश लाभला असून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या देवभूमीला पांढरीशुभ्र वाळू असलेले स्वच्छ सागरी किनारे, अनेक प्रेक्षणीय मंदिरं, डोंगर-द-या व फळ बागायतींचं नंदनवन लाभलं आहे. येथील विविध शिल्पकलाविष्काराने समृद्ध असलेली पुरातन मंदिरं हे कोकणचं वैभव आहे. मुळातच श्रद्धाळू असलेल्या कोकणी माणसाचं संस्कृतीवर व धार्मिक रितीभातींवरही प्रेम त्यामुळे सण आणि उत्सव हे कोकणी माणसाला प्राणाहून प्रिय असतात. म्हणूनच ग्रामदैवतांच्या उत्सवात संपूर्ण गाव एकमुखाने सामील होऊन तो उत्सव यशस्वी करतं, हे विशेष! देवगडपासून सहा कि. मी. अंतरावरील वाडा गावातील वाडातर ही वाडी. तिथे श्रीक्षेत्र हनुमान मंदिर हे अगदी समुद्रालगत भराव टाकून डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेलं अतिशय प्रेक्षणीय असं मंदिर आहे. १९८१ मध्ये प. पू. गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिरात श्रीहनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा सात वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून या वास्तूची पुनर्बाधणी करण्यात आली.
या मंदिराचा घुमट उंच व अष्टकोनी असून सुमारे २० फूट उंच आहे. गाभा-यात गदाधारी व पर्वत उचलून घेतलेली साडेतीन फूट उंचीची मारुतीची गगनात झेपावणारी आकर्षक मूर्ती आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीसमोर गाभा-याच्या बाहेर खांब असून त्यावर अष्टकोनी कळस आहे. समोर भव्य पटांगण असून सभोवती कठडय़ाचं बांधकाम केलेलं आहे. विशेष म्हणजे, मंदिरात आतपर्यंत सूर्यकिरण येत असल्याने सबंध मंदिर तेजोमय असतं. सागर तरंगांवर तळपणारं मंदिर त्याच्या सभोवतालच्या गर्द हिरव्या वनराईत अतिशय विलोभनीय दिसतं. देवगड व विजयदुर्ग यांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून दिसणारा वाडातर मंदिराचा संपूर्ण परिसर इथं येणा-या पर्यटकांना मनमुराद आनंद नक्कीच देऊन जातो.
या मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून सलग चार दिवस श्रीहनुमान जयंती उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांनी हा उत्सव रंगला आहे. शिमगोत्सवानंतर मुंबईत परतलेले वाडे गावाचे चाकरमानी तितक्याच श्रद्धेने या सोहळ्यालाही सहकुटुंब उपस्थित राहतात. या वेळी संपूर्ण किनारपट्टीलगत मंदिर परिसरात भव्य कमानी उभारल्या जातात. विद्युत रोषणाई, भाविकांच्या स्वागताचे फलक आदींनी संपूर्ण परिसर सजलेला असतो. इथली वैशिष्टय़पूर्ण विद्युत रोषणाई पाहणं, हे खास आकर्षण असतं.देवगड – वाडातर गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर….

निसर्गरम्य कोकणाला ७२० कि. मी. लांबीचा सागरी प्रदेश लाभला असून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या देवभूमीला पांढरीशुभ्र वाळू असलेले स्वच्छ सागरी किनारे, अनेक प्रेक्षणीय मंदिरं, डोंगर-द-या व फळ बागायतींचं नंदनवन लाभलं आहे. येथील विविध शिल्पकलाविष्काराने समृद्ध असलेली पुरातन मंदिरं हे कोकणचं वैभव आहे. मुळातच श्रद्धाळू असलेल्या कोकणी माणसाचं संस्कृतीवर व धार्मिक रितीभातींवरही प्रेम त्यामुळे सण आणि उत्सव हे कोकणी माणसाला प्राणाहून प्रिय असतात. म्हणूनच ग्रामदैवतांच्या उत्सवात संपूर्ण गाव एकमुखाने सामील होऊन तो उत्सव यशस्वी करतं, हे विशेष! देवगडपासून सहा कि. मी. अंतरावरील वाडा गावातील वाडातर ही वाडी. तिथे श्रीक्षेत्र हनुमान मंदिर हे अगदी समुद्रालगत भराव टाकून डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेलं अतिशय प्रेक्षणीय असं मंदिर आहे. १९८१ मध्ये प. पू. गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिरात श्रीहनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा सात वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून या वास्तूची पुनर्बाधणी करण्यात आली.
या मंदिराचा घुमट उंच व अष्टकोनी असून सुमारे २० फूट उंच आहे. गाभा-यात गदाधारी व पर्वत उचलून घेतलेली साडेतीन फूट उंचीची मारुतीची गगनात झेपावणारी आकर्षक मूर्ती आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीसमोर गाभा-याच्या बाहेर खांब असून त्यावर अष्टकोनी कळस आहे. समोर भव्य पटांगण असून सभोवती कठडय़ाचं बांधकाम केलेलं आहे. विशेष म्हणजे, मंदिरात आतपर्यंत सूर्यकिरण येत असल्याने सबंध मंदिर तेजोमय असतं. सागर तरंगांवर तळपणारं मंदिर त्याच्या सभोवतालच्या गर्द हिरव्या वनराईत अतिशय विलोभनीय दिसतं. देवगड व विजयदुर्ग यांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून दिसणारा वाडातर मंदिराचा संपूर्ण परिसर इथं येणा-या पर्यटकांना मनमुराद आनंद नक्कीच देऊन जातो.
या मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून सलग चार दिवस श्रीहनुमान जयंती उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांनी हा उत्सव रंगला आहे. शिमगोत्सवानंतर मुंबईत परतलेले वाडे गावाचे चाकरमानी तितक्याच श्रद्धेने या सोहळ्यालाही सहकुटुंब उपस्थित राहतात. या वेळी संपूर्ण किनारपट्टीलगत मंदिर परिसरात भव्य कमानी उभारल्या जातात. विद्युत रोषणाई, भाविकांच्या स्वागताचे फलक आदींनी संपूर्ण परिसर सजलेला असतो. इथली वैशिष्टय़पूर्ण विद्युत रोषणाई पाहणं, हे खास आकर्षण असतं.
मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह विविध कलांना उत्तेजन देणा-या कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. धार्मिक उत्सवामध्ये श्रीजन्मोत्सव, होमहवन, लघुरुद्राभिषेक, ग्रंथवाचन, भजन-प्रवचन, महापूजा, आरती, भंडारा, पालखीची मिरवणूक, अवसर काढणं, नवस बोलणं व फेडणं अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. संपूर्ण चार दिवस वातावरण आनंदी व भक्तीमय असल्याने श्रद्धा व संस्कृतीच्या मिलाफाची अनुभूती येते.

मंडळाचे मुंबई मध्ये अनेक सामाजिक उपक्रम
दर सहा वर्षांनी रक्तदान शिबीर तसेच पालघर येथील आदिवासी पाड्यावर जावून शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले..
शक्ती, भक्ती व त्यागाचं प्रतीक असलेल्या श्रीहनुमान मंदिरात साजरा होणारा हा उत्सव देवगड तालुक्यातील एक भव्य-दिव्य असा उत्सव असल्याने तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. समाजसेवेला अध्यात्माचं अधिष्ठान देणारा वाडातरचा श्रीहनुमान मंदिराचा जयंती उत्सव हजारो भाविकांना भावतो म्हणूनच कोकणातील समुद्रकिनारी वसलेल्या या हनुमान मंदिराला धार्मिक पर्यटन म्हणून एकदा तरी अवश्य भेट द्यावी!
मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह विविध कलांना उत्तेजन देणा-या कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. धार्मिक उत्सवामध्ये श्रीजन्मोत्सव, होमहवन, लघुरुद्राभिषेक, ग्रंथवाचन, भजन-प्रवचन, महापूजा, आरती, भंडारा, पालखीची मिरवणूक, अवसर काढणं, नवस बोलणं व फेडणं अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. संपूर्ण चार दिवस वातावरण आनंदी व भक्तीमय असल्याने श्रद्धा व संस्कृतीच्या मिलाफाची अनुभूती येते.
शक्ती, भक्ती व त्यागाचं प्रतीक असलेल्या श्रीहनुमान मंदिरात साजरा होणारा हा उत्सव देवगड तालुक्यातील एक भव्य-दिव्य असा उत्सव असल्याने तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. समाजसेवेला अध्यात्माचं अधिष्ठान देणारा वाडातरचा श्रीहनुमान मंदिराचा जयंती उत्सव हजारो भाविकांना भावतो म्हणूनच कोकणातील समुद्रकिनारी वसलेल्या या हनुमान मंदिराला धार्मिक पर्यटन म्हणून एकदा तरी अवश्य भेट द्यावी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!