
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन ३० एप्रिल २०२३ ला २५ वर्षे पूर्ण होत आहेत तसेच केंद्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यास पर्यटन वाढीसाठी दत्तक घेतले असून जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा विचार करता थोडंफार सागरी पर्यटन सोडून पर्यटन क्षेत्रात लक्षवेधी काम झालेले नाही. पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 350 ग्रामपंचायतींना सोबत घेऊन कार्य करणार आहे