shree-swami-samarth-math-hadpid

श्री स्वामी समर्थ मठ हडपिड

Spread the love

!! श्री स्वामी समर्थ !!
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार मुंबई जोगेश्वरी या परीवाराने व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड त्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर धाकु राणे व संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर विश्वस्त श्री ज्ञानेश्वर राऊत आणि सहकारी यांनी स्वामी कृपेने देवगड हडपीड शिरगाव येथील नयनरम्य परीसरात,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय सुंदर सुरेख मठ प्रस्थापीत केला आहे.तिथे अन्नदान, वैद्यकीय सेवा, गावागावात जाऊन गरजुंपर्यंत मदत पोचविणे,रुग्ण सेवा,सर्वांना स्वामी भक्तीतुन भक्ती मार्गदर्शन करणे असे अनेक उपक्रम राबविले जातात.सध्या मठाच्या उर्वरित बांधकामासाठी व मठाच्या अन्नछत्राच्या बांधकामांसाठी निधीची खुप मोठी गरज आहे.आतापावतो देश व विदेशातुन स्वामी भक्तांनी सढळहस्ते देणगी दिली आहे सध्या अन्नछत्राचे व भक्तनिवासाचे बांधकाम चालू आहे. जाना बांधकामासाठी निधी द्यायचा असल्यास त्वरीत संपर्क साधावा ही विनंती.
कोकणातील अतिशय सुंदर सुरेख स्वामी मठास एकदातरी भेट द्या, आपनास स्वामी भक्तीची ओढ काय असते त्याची प्रचिती येईल.
तसेच गेल्या प्रगट दीनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे मठाचे संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी प्रकाशित केलेले पुस्तक !! स्वामीकृपेची अनुभूती..!! महाराजांची आधुनिक बखर घेऊन वाचावी ही विनंती. महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात त्याचि प्रचिती आपल्याला येईल.


आपनास देवगड हडपीड स्वामी समर्थ मठासंबधी अधीक माहिती हवी असल्यास संपर्क साधा
श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
संस्थापक सचिव
मों.नं.९९६९३४०६८८
९८६९०१४१२३
श्री प्रभाकर धाकु राणे
संस्थापक अध्यक्ष
हो.नं.८६९१८८८९६२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!