vengurla

वेंगुर्ला बंदर

Spread the love

       वेंगुर्ला हे बंदर म्हणून काही वर्षांपूर्वी खूप प्रसिध्द होते. जमिनीवरील वाहतूक अत्यंत मर्यादित होती, त्यावेळी कोकणात समुद्रमार्गे सर्व व्यवहार चालायचे. मुंबई-गोवा समुद्र मार्गावरील वेंगुर्ला हे एक मोठे बंदर होते. येथे दीपगृह आहे. डचांच्या वखारी आहेत. कोकण कृषी विद्यापीठाचे काजू संशोधन केंद्र आहे. वेगवेगळया फळझाडांची रोपे शासकीय तथा खाजगी रोपवाटिकांमधून उपलब्ध होतात.राहण्यासाठी व उत्कृष्ट कोकणी जेवणासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. समुद्रकिना-याच्या उंच टेकडीवर शासनाचे ‘सागर’ हे अत्यंत रमणीय विश्रामगृह आहे. संध्याकाळी या ठिकाणाहून सूर्यास्ताचे दर्शन करण्यासाठी बरीच गर्दी असते. सकाळचा सूर्योदय देखील येथून चांगला दिसतो. शासनाने वेंगुर्ला ते मालवण हा जवळजवळ ४० किलोमीटरचा सागरी महामार्ग नुकताच विकसित केला आहे. समुद्राच्या काठाकाठाने माडांच्या अन् पोफळीच्या बागातून चढ उतारांचा आणि वळणांचा हा अत्यंत देखणा रस्ता असून केवळ त्या रस्त्याने रमतगमत प्रवास करणे हाच एक मोठा आनंद आहे.

       मुंबईहून रेल्वेने सांवतवाडी व तेथून साधारण २८ ते ३० किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला आहे. मुंबईहून राष्ट्रीय महामार्गाने आल्यास कुडाळहून ही वेंगुर्ल्याला जाता येते. कुडाळ-वेंगुर्ला २२ ते २५ किलोमीटर अंतर आहे. वेंगुर्ला हे क्रिकेटच्या ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्करचे गाव.

Translate »
error: Content is protected !!