विंदा करंदीकर

Spread the love

विंदा करंदीकर

विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.

विंदा करंदीकर यांच्या पत्‍नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

vinda karandikar

ज्ञानपीठ पुरस्कार


विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार


महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.

 

विंदांचे समग्र वाङ्मय

विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.

पुरस्कार आणि पदवी

कबीर सन्मान १९९१
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
केशवसुत पुरस्कार
कोणार्क सन्मान (१९९३)
जनस्थान पुरस्कार १९९३
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)

Translate »
error: Content is protected !!