देवमामलेदार

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या. हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले. श्री देव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो. श्री देव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण ११. त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे. येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात. हा सोहळा १५ दिवस चालतो. यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. सटाणा हे देव मामालेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे. भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.

श्री देवमामलेदार पादुका सुकळवाड

श्री पद्मनाभस्वामी आपल्या गुरु विषयी स्वामीच्या लीला वर्णिताना म्हणतात,

|| श्री उर्वाच्य  || अभंग विषम चरणी ||

निपुत्रिका पुत्र I निर्धनासी धन I चिरंजीव जाण I मज केले II
याचकांसी तृप्त I स्वपत्नीचे दान I अज्ञाना सज्ञाना I केले जणे II
राजकीय धन I राजा ज्ञे वांचून I ब्राह्मणासी दान I ज्याने दिले II
योग्यचि हिशोब I साहेबा दाविला I अर्धा आणा दिल्हा I वाढ जेणे II
नवसा पावणे I पाखांड्याचा छळ I करी घननिळ I जयासाठी II
मांसाची मालिका I पुष्पवत केली I गळ्यात घातली I पाखांड्याच्या II
मार्गाने चालतां I मांस पूर्ववत I दाविले गळ्यांत I पाखांड्यासी II
छीथू सर्व ज्यनी करोनी पाखांड्या I म्हणाले कां वेड्या I केला छळ II
हजारो रुपये I कर्जाव काढून I याचकासी दान I ज्याणे दिले II
मेलेला बालक I ज्याणे उठविला I त्या स्वामींची लीला I वाणू काय II
सत्र्या पाटलाचे I पांचशे रुपये I घेवोनिया स्वयें I दान केले II
धुळ्यात मालेगावीI जातां पाठवीन I दिधले वचन I पाटलासी II
परी विसरले I आठवण नाहीI ईशे लवलाही I फेडियले II
पद्मा म्हणे ईशे I भैयाजी होऊनI स्वामींचे वचन I पूर्ण केले II
नवसा पावले I सत्य तें वच्यन I असत्य भाषण I मुळी नाही II
अजुनी पावतीI करिता नवस I परी भाव त्यास I समर्पिता II
पद्मनाभ म्हणे I गुरु यशवंता I नवस बहुतां I लोकी केले II

परमपूज्य देव मामलेदार यशवंत महाराज एक सिद्धपुरुष, चरित्रचिंतन

श्रीदत्त भक्तीमध्ये रममाण असणारे व आपल्या भक्तीने इतरांचे कल्याण व्हावे ही सदिच्छा असणारे जे अधिकारी सत्पुरुष आहेत व ज्यांच्या चरणाशी आपली कायमच शरणागत अवस्था असावी, त्यामधील प. पू. देव मामलेदार महाराज (१८१५ – १८८७) यांचेही महत्व मोठे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमद प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी अगदी सुरवातीच्या काळामध्ये आपल्या मातोश्रीबरोबर नाशिक येथे प. पू. देव मामलेदार महाराज यांचे दर्शन घेतले होते. श्रीमद प प वासुदेवानंद महाराज यांच्या मुखाकडे बघून  “हे फार मोठे अधिकारी योगी आहेत” असे कौतुकाचे भावोद्गार प. पू. देव मामलेदार महाराज यांनी काढले होते. पुण्यामध्ये श्री महाराजांना लहानपणापासूनच श्रीदत्तभक्तीची ओढ लागली. १८७० च्या काळामध्ये  सटाणा नाशिक येथे सरकारी अधिकारी असताना त्यांचा “मामलेदार’ हा हुद्दा होता. पण वेळोवेळी त्याचा उपयोग त्यांनी गरजू व अडचणीत असलेल्याना धन व धान्य देऊन केला.

जसे “देवाने” अडचणी सोडवण्यासाठी धावून यावे तसे श्री महाराजांचे वागणे. सर्व जनासाठी असे हे “देव मामलेदार” होते. याबरोबरच श्रीदत्त उपासना व “श्रीदत्तात्रेयांचे” प्रत्यक्ष दर्शन झाल्याने श्रीदत्तभक्तीचे तेज होतेच. त्यामुळे आपल्या भक्तीअधिकाराने सर्वांच्या अडचणी सोडवाव्यात असे करुणाकर वागणे असल्याने “प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज” या नावानेच प्रसिद्ध्द झाले. या मायेच्या संसारामध्ये प.पू. देव मामलेदार यशवंत महाराज यांची पुण्यतिथी हा एक देहसोहळा श्रीदत्तलींन होणे हे जन्माचे सार्थकच. पण प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज इथेच सभोवार आहेत असे प्रत्येक भक्तांचा विश्वास आहे. 

देव मामलेदार यांचा १२ डिसेंबर १८८७ रोजी नाशिक येथे मृत्यू झाला. नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले.

प. पू. देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या चरणी शरणभाव ठेवून कोटी कोटी वंदन!

भक्तांचे श्रद्धास्थान