Spread the love

रत्नागिरीत जाताना सातत्याने गेली दहा पंधरा वर्षे मी या किल्ल्याची गळाभेट घेऊनच पुढे जातो….
दरम्यानच्या काळात यशवंत गडा प्रमाणे या किल्ल्याचे स्वरुप पण नवीन बांधकामा मुळे बदलत गेलं.
बऱ्यापैकी पडझड झालेला हा गेला पडझड असलेल्या परिस्थिती, काम व‌ दुरुस्ती चालू असताना व आता बांधकाम पुर्ण झाल्यानंतर अश्या तिन्ही अवस्थेत मी पाहिला‌.
बांधकाम मुळांचा ढाचा जशास तसा ठेवून केल्या बद्दल पुरातत्व विभागाचे मनापासून धन्यवाद….
या किल्ल्याचा नेमका इतिहास मिळत नाही हे दुर्दैव आहे….
स्वराज्य बांधणी काळात
शिवरायांनी हा शेवटचा किल्ले बांधला म्हणून तो पुर्णगड म्हटला जातो..पण या बाबतीत ठोस पुरावा सापडत नाही.
किल्ला पूर्णगड , १७०५ – १७१० या आगरे कालात बाधला असावा असंही म्हटलं जातं.

१८६२ मध्ये गडावर ७ तोफा व ७० गोळे सापडले.काहीच्या मते पेशवे काळात सरदार धुळप यांनी बाधला. किल्ला सिधुसागराचा किनारा वर मुचकुदी खाडी मुखाशी टेकडी वर उभा असून विशालगडा जवळील माचाळ येथील परवतातील मुचकूडी नदी सागराला मिळते.
काहीच्या मते अठराव्या शतकात पेशवे सरदार हरबाराव धुळप यांनी बांधला.
काहीच्या मते हि किल्ला मराठा आरमार प्रमुख सखोजी आंग्रे यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी बांधला…
इतिहास बाबतीत संभ्रमावस्था असली तरी पायथ्याशी प्राचीन महादेव मंदिर, महाद्वार कमानीवर गणपती, दोन्ही बाजूंनी देवड्या, लपविलेले महाद्वार, प्रशस्त व भक्कम तटबंदी, सहा वैशिष्ट्य पुर्ण बुरुज, तटबंदी वरून दिसणारं सागराचे विहंगम दृश्य या अनेक वैशिष्ट्यांमुळे आपण पावस मार्गे रत्नागिरीत जाताना नक्कीच एकदा रस्त्यावरच दहा मिनिटांत चालतं गाठु शकाल असा हा किल्ला नक्कीच पहा….