फुलपाखरू उद्यान होणे गरजेचे

Spread the love

   सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आढळून येतात. मात्र त्यांच्या संवर्धनासाठी शासन पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. फुलपाखरू हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरत असल्याने फुलपाखरू उद्यान होणे गरजेचे असल्याचे मत फुलपाखरू तज्ञ हेमंत ओगले यांनी बोलताना व्यक्त केले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२० ते २२५ प्रजातीची फुलपाखरू आहेत. आंबोली आणि पारपोली भागात २१८ प्रजातीची फुलपाखरू आढळतात तसेच तिलारी पट्ट्यात देखील फुलपाखरांचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील फुलपाखरांच्या यादीत आता आणखी एका प्रजातीच्या फुलपाखराची भर पडली आहे. पट्टासूर म्हणजेच ‘डेमॉन’ प्रजातीतील हे फुलपाखरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळले असून, ‘कॉमन बॅण्डेड डेमॉन’ असे या फुलपाखराचे नाव आहे. वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ‘निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्रातर्फे या फुलपाखराबाबतचे पुरावे नुकतेच सादर करण्यात आले आहे. केंद्रातर्फे फुलपाखरांच्या अभ्यासासाठी आंबोली येथे आयोजित अभ्यास सहलीदरम्यान या फुलपाखराची नोंद घेण्यात आली आहे.

          आंबोली टोड, स्थानिक भाषेत वाघ्या बेडूक हे यांपैकीच एक! वन्यजीव अभ्यासक वरद गिरी आणि एस. डी. बिजू यांनी २००९मध्ये आंबोली टोड या बेडकाचा शोध लावला. गेल्या काही वर्षांत या बेडकाचा अधिवास धोक्यात आला आहे. आंबोलीची ओळख असलेले हे बेडूक दुर्मीळ होऊ नये,    यासाठी आंबोलीत काम करणाऱ्या मलबार नेचरक्लबने गावकऱ्यांच्या सहभागातून बेडकाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन संस्थेचे काका भिसे, फुलपाखरांचे अभ्यासक हेमंत ओगले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बेडकाला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेसाठी पुण्यातील ग्रीन फाउंडेशनचे सचिन नायर यांनी आर्थिक मदत केली आहे. आंबोली टोड हा प्रदेशनिष्ठ बेडूक असून, दुर्मीळ आहे. आंबोलीतील सड्यांवरच तो आढळतो. तेथील ठरावीक दगडांवरच त्यांचे वास्तव्य असते.जगात मोजक्या संख्येने असलेली ही प्रजाती वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.