चारशे वर्षांपूर्वीचा अद्भूत दस्तऐवज

Spread the love

खाशांचे ‘़कुशे’ झाले…

     350 ते 400 वर्षांपूर्वीचा 2500 चौरस फुटांवर उभा असलेला तीन मजली 27 खोल्यांचा अद्भुत, रहस्यमय मांडणीचा प्रशस्त, प्रसन्नता व शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा भक्कम कुशेवाडा. या वाड्याचा अंतर्भाग पाहिला असता अनेक ऐतिहासिक गोष्टींना उजाळा मिळतो. वाड्याच्या कानाकोपर्‍यातून, प्रत्येक खोलीतून, प्रत्येक भिंतीतून जाणार्‍या जिन्यातून न विचारता इतिहास बोलू लागतो. सर्वत्र नीरव शांतता. कानावर पडत असतो फक्त लाटांचा आवाज. विशिष्ट प्रकारच्या खिडकीतून सूर्यप्रकाश सर्वत्र खेळत आहे. दिवाणखान्याजवळची खोली किल्ल्यापर्यंत तेथील विहिरीत पोहोचलेल्या समुद्रांतर्गत भुयाराची ओळख सांगते. गवताच्या गाठी मारून बनविलेल्या गुप्त संदेश. कोणीतरी हेरेकारी, निरोप्या, संदेशवाहक हातात किल्लेदाराचा संदेश आणून देईल असे वाटते. दिवाणखान्यातील देव्हार्‍यातील आशीर्वाद देणारी कुशांची कुलदेवता तुळजाभवानी रक्षणकर्ती वाटते.

        मालवणचा एक भूमिपुत्र आपल्या धनराशीसह छत्रपती शिवाजी राजांमागे खंबीरपणे उभा राहिला. हा वैश्यवाणी ज्ञातीतील ‘कुशे’ कुलनामाचा धनिक. सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर किल्ल्यातील सैन्याला, तिथल्या मानकर्‍यांना व अधिकार्‍यांना रसद पुरविण्याचा, आर्थिक सहाय्य करण्याचा अधिकार या घराण्याकडे होता. ते राजांचे सावकार होते. त्यांची महाराजांच्या सेवेतील खास मंडळीत गणना झाल्याने त्यांना खासे असे संबोधले जात असे. पुढे खाशांचा अपभ्रंश कुशे असा झाल्याची शक्यता वर्तविली जाते. सध्या र्घीीहश किंवा र्घीीश असा उच्चार करतात. अशा या सावकार किंवा साहुकार या शब्दाचा अर्थ व महत्त्व लक्षात घेण्यासाठी अमात्य रामचंद्र यांनी लिहिलेले आज्ञापत्र वाचलं पाहिजे. यात शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण सूत्ररूपाने येते व या लोकांना त्यांनी दिलेला बहुमानही लक्षात येतो. “साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. साहुकारांकरिता राज्य आबादान होते. न मिळे ती वस्तूजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते. याकरिता साहुकाराचा बहुमान चालवावा… त्यास अनुकूल ते जागा, दुकाने देऊन ठेवावे.” नारूर, खारेपाटण, मालवण, रामगड, राजगड येथील बाजारपेठेच्या अवशेषांवरून याचे मोल समजून येते. राजांनी कुशे घराण्याकडून घेतलेल्या धनराशीच्या परतफेडीसाठी कांदळगाव आंदण दिला होता. तेथील कर वसूल करून त्या वसुलीतून कर्ज फेडायचे होते. त्याचा एक संदर्भदुवा अजूनही आहे. दर तीन वर्षातून कांदळगावचा देव श्री रामेश्वर सिंधुदुर्ग किल्ला भेटीला येतो. त्या भेटीनंतर मौनी महाराजांच्या देवळास भेट देऊन कुशेवाडा या वाड्यात येतो. येथे सर्वांना प्रसादाचे जेवण दिले जाते. शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहत चालू आहे व वारसदार भक्तिभावाने तो अजूनही चालवितात. या घराण्याचा व्यवसाय होता गलबतातून वाहतूक करण्याचा. जहाजातून माल घेऊन व्यापार चालायचा. पुढील पिढीत पेढी व्यवसायही सुरू होता. शिवरायांच्या ताब्यात इ. स. 1664 मध्ये कोकण किनार्‍यावर 8 ते 9 बंदरे होती. गोवा, रेडी, मालवण, विजयदुर्ग, खारेपाटण, जैतापूर, मालडी, श्रीवर्धन, वेंगुर्ला, राजापूर, सोपारा, वसई, म्हसळे, जयगड, खेड, संगमेश्वर, ठाणे, कल्याण, मादांद, महाड, देवगड, चौल, चितापल्ली, कारवार या समुद्र व वाघोटन, देवगड, कुर्ली, तेरेखोल, सुखशांती, गड, कणकवली, जानवली, मोचेमाड या नदीकिनारी तसेच उल्हास, सावित्री, जगबुडी खाडीतून प्रचंड व्यापार चालायचा. कारवार, चिपळूण, डिचोली, वेंगुर्ला ही मोठी व्यापारी केंद्रे होती. नाणेघाट, थळ घाट, बोरघाट, अंबा, फोंडा, आंबोली या घाटातून माल घाटमाथ्यावर जायचा. तेथे चौक्या व जकातीची नाकी होती. 1638 साली डचांची वखार वेंगुर्ला, 1765 साली इंग्रजांची वखार मालवण, 1649 साली इंग्रजांची वखार राजापूर, दाभोळ, कारवार, 1468 मध्ये मोठी शहरे व बंदरे या ठिकाणी होती असे द चार्ल्स कॉसेट निकितीन या रशियन प्रवाशांने लिहून ठेवले आहे. राजांनी बंदराची व्यवस्था अशी केली होती, ‘ज्या बंदरास मोहरी किल्ला त्या किल्ल्याचे दहशतीने गनीम खाडीत शिरो न शके’. यामागे राजांचे संरक्षण होते. त्यामुळे बंदरातून सिलोन, कोचिन, इराण, बसरा, लाल समुद्र, पार्शिया, बव्हेरिया, जपान, बंगाल, सुरत, ओर्मुझ अरब राष्ट्रे, मक्का, इराण, मस्कत, एडन येथे माल घेऊन व्यापारी जहाजे जायची. मोठी आयात-निर्यात चालायची. कपडा, तूर, मिरी, मीठ, खजूर, बदाम, पिस्ता, लोखंड, शिसे, युद्धजन्य सामुग्री आयात व्हायची. त्यामुळे स्वराज्याचा खजिना समृद्ध झाला होता. यामुळेच कोकणास नवनिधी म्हणून ओळखले जायचे. या व्यापार्‍यांची 45 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जहाजे समुद्रावर अधिराज्य गाजवीत होती. त्यामध्ये गुराब, तारंडी, गल्बत, दुबारे, सिबाडे, पगारू, मचवा, वाभोर, तीरकती, पाल, रोनाद, जुगवे होती. थॉ वेनार परदेशी हा प्रवाशी लिहितो, ‘चौल ते गोवा ही 250 मैलांची किनारपट्टी शिवाजीच्या ताब्यात होती. त्यामुळे या किनारपट्टीवर कितीतरी शहरे, बंदरे होती. त्यामुळे उद्योगधंदे भरभराटीस आले. परदेशी व आंतरदेशीय व्यापार करण्यास ही उत्तम किनारपट्टी आहे. थोडक्यात सांगायचे तर प्राचीन मध्यकाल आणि अर्वाचीन काळात राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक इतिहास या कोकण किनार्‍याने घडविला. पृथ्वी समुद्राने व्यापल्याने व्यापार व लढाऊ जहाजांचा संचार त्याकाळी विस्तृत व अनिर्बंध होता. राजांच्या स्वराज्यामुळे सुरक्षित व कार्यक्षम संघटित आरमार व ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गाच्या जंजिर्‍याच्या किल्ल्यांच्या सहाय्याने असल्याने मालवण व परिसरातील बंदर ठिकाणे येथे फार मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. दूरदूरवर प्रदेशात हुकमत चालविली गेली. राजांनी पोर्तुगीज, हबशी, सिद्धी, इंग्रज, डच या संधिसाधू व लढवय्यांना तोंड देऊन स्थानिक कुशेंसारख्या व्यापार्‍यांना दर्यावर्दींनी आधार देऊन चौर्‍यांशी बंदरी ऐसी जागा नाही, असा सिंधुदुर्ग उभा करून त्याला पद्मगड, राजकोट, सर्जेकोट या दुर्गांचा जागता पहारा ठेवला व व्यापारास वैभव प्राप्त करून दिले.

     ‘कुशे’ या कुलनामाच्या वैश्यवाणी ज्ञातीचा अभ्यास करताना वेदात उल्लेखिलेल्या या ज्ञातीचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो. वर्णव्यवस्था अस्तित्वात आल्यावर ज्ञातीचा उल्लेख शेती, गोपालन, व्यापार करणारा या शब्दाचा उच्चार होऊ लागला. वैदिक काळापासून वरील काम करणार्‍यांना वैश्य संज्ञा प्राप्त झाली. ‘ब्राह्मणोस्य मुख मासीद बाहू राजन्य: कृत: । उरुतस्य द्वैश्य: षद्भ्याम् शुर्द्रो अजायत ॥ (यजुर्वेद-31/11)

     ‘मांड्याचे अर्थात समाजधारणाचे म्हणजेच द्रव्योत्पादनाचे काम करणार्‍यास वैश्य म्हणावे असा उल्लेख आहे. असा हा कुशे दानधर्मी, अनेकांचा पोशिंदा बहुत जनांस प्रिय होता.’  

     ऐतिहासिक व्यक्तींचा परिचय हे धाडसाचे काम. म्हणजे अव्यापारेषू व्यापार म्हणायचा. अल्प वाचण्याच्या गोडीने माझ्या कोकणातील थोर विभूतींचे समाजास दर्शन व्हावे, ह्यासाठी दिंडी दरवाजा किलकिला करण्याचा हा प्रयत्न. या कुशे घराण्याचे सध्या कुशे वाड्यात असलेले सद्य:पिढीचे वारसदार प्रकाश कुशे (निवृत्त स्टेट बँक कर्मचारी) यांची घराण्यासंदर्भात मुलाखत घेतली. अनेक आख्यायिका परंपरागत ऐकीव बातम्यांच्या आधारावर हे कुशे श्रेष्ठींचे शब्दचित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न. या सर्व प्रयत्नांना सर्वात मोठा आधार आहे तो 350 ते 400 वर्षांपूर्वीचा 2500 चौ.फुटावर उभा असलेला तीन मजली 27 खोल्यांचा अद्भुत, रहस्यमय मांडणीचा प्रशस्त, प्रसन्नता देणारा, सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा भक्कम कुशेवाडा. या वाड्याचा अंतर्भाग पाहिला असता अनेक ऐतिहासिक गोष्टींना उजाळा मिळतो. वाड्याच्या कानाकोपर्‍यातून, प्रत्येक खोलीतून, प्रत्येक भिंतीतून जाणार्‍या जिन्यातून न विचारता इतिहास बोलू लागतो. सर्वत्र नीरव शांतता… कानावर पडत असतो फक्त लाटांचा आवाज. विशिष्ट प्रकारच्या खिडकीतून सूर्यप्रकाश सर्वत्र खेळत आहे. दिवाणखान्याजवळची खोली किल्ल्यातील विहिरीपर्यंत पोहोचलेल्या समुद्रांतर्गत भुयाराची ओळख सांगते. गवताच्या गाठी मारून बनविलेल्या गुप्त संदेश कोणीतरी हेरेकारी, निरोप्या, संदेशवाहक हातात किल्लेदाराचा संदेश आणून देईल असे वाटते. दिवाणखान्यातील देव्हार्‍यातील आशीर्वाद देणारी कुशांची कुलदेवता तुळजाभवानी रक्षणकर्ती वाटते. शेजारी असलेल्या लाकडात बनविलेल्या पुरातन नयनमनोहर राम, सीता, लक्ष्मण, मारुती व विष्णूच्या मूर्ती पाहताच मनास मंत्रमुग्ध करतात. त्यांचे चेहेरे पाहता राजा रविवर्माच्या चित्रातील साम्य शोधायला लावतात. दुसर्‍या मजल्यावर भिंतीवर प्राचीन चित्रे रंगविलेली होती. पण येथेसुद्धा अनास्था… नवीन रंगाच्या आड ही चित्रे झाकली गेली. त्यामुळे एका सुंदर अनुभवाला मुकायला झाले. मात्र, भिंती पाहताना विजयदुर्गजवळच्या रामेश्वर मंदिरातील भिंतीवरील चित्रांचा भास होतो. त्या मजल्यावरील गुप्त दरवाजे, कागदपत्रांची खोली, त्यांच्या रचना, उद्देश हे सर्व कल्पनेच्या पलीकडील अतर्क्य आहे. मात्र घरातील शांतता, थंडावा व प्रसन्नता एखाद्या मंदिराच्या गाभार्‍यातील अस्तित्व दाखविते. घरातील एक छोटा दिवा ज्ञानेश्वरांच्या चित्रातील ज्ञानेश्वरीजवळ. मजल्याची जमीन ही मातीची. प्रकाशराव म्हणतात, ‘काही ठिकाणी काँक्रीटीकरण करताना खोदकामाच्या वेळी या मातीत काही वनस्पती व काटे असलेली काष्ठे मिळाली. कदाचित एवढ्या तीन शतकानंतर वाळवी लागली नाही याचा अर्थ ती वनस्पती वाळवीरोधक होती.

     घरात वापरलेली दीड ते दोन फूट जाडीची सागवानाची 25-25 फूट लांब लाकडे मती गुंग करतात. भिंतीतून गेलेले चिरेबंदी जिने भिंतीच्या जाडी सांगून जातात. यापेक्षा ऐतिहासिक काय असू शकेल हा प्रश्नच ? इतिहास लिहिण्यासाठी अस्सल व विश्वसनीय साधनांची गरज असते. शिवकालाबाबत अस्सल साधनांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. कुशे या ऐतिहासिक घराण्याबाबत हेच घडले.

     मागील पिढ्यांची अनास्था… त्यामुळे कागदपत्रे वाळवीच्या, काळाच्या ओघात भक्ष्यस्थानी पडली. पोराबाळांनी शेकोट्या पेटवल्या. ज्यांच्याकडे कागदपत्रे संशोधनासाठी दिली ती त्यांनी पुन्हा दिलीच नाहीत. त्यामुळे दुर्मीळ कागदपत्रांचा शोध दुस्तर. आख्यायिका, ऐकीव परंपरागत बातम्या हेच आधार. कागदपत्रे, बखरी, शकावल्या, पत्रव्यवहार सुव्यवस्थित ठेवणे हा काही आपला स्वभाव नाही व प्रांतही नाही. तसेच या सर्वात बरेचसे दोष, उणिवा व मर्यादाही आहेत. त्यामुळे आपण तर्काचे घोडे हाकणे किंवा हवेत मनोरे बांधणे एवढेच करू शकतो. मात्र, कुशे वाड्याचा इतिहास मोठा आणि दस्तऐवज म्हणजे हा साक्षात वाडाच आहे. त्यांचे वंशज प्रकाश कुशे पत्नी व गुरूराज आणि अभिषेक या मुलांसह या वाड्याची काळजी घरातील वडीलधार्‍यांसारखीच घेत आहेत.

     त्यांनी वाड्याचे सुशोभीकरण केले आहे. मात्र, वाड्याचा इतिहास कधीच विस्मृतीत जाणार नाही याचीही ते खबरदारी घेतात हे वाडा पाहताना लक्षात येते. आपल्या देशातील मोठ्या राजेरजवाड्यांनी आपल्या राजवाड्यांचीही हॉटेलं बनविली. मात्र, या घराण्याने वास्तूला देवतेचा दर्जा देऊन तिचे पावित्र्य राखले आहे. हे मालवणवासियांसह सर्वांनाच अभिमानास्पद आहे.

     कुशे घराण्यासह मालवणी व कोकणी व्यापार्‍यांचा मोठा इतिहास परकीय प्रवाशांच्या वृत्तांतात आहे. मोठा अभ्यासाचा विषय.. . जर हा बुद्धिवाद्यांनी केला तर भूतकाळाच्या आड, विस्मृतीत गेलेले अनेक पूर्वज आपल्या समोर येतील.

     यातील इंग्रजी साधने फॅक्टरी रेकॉर्डस् थॉमस निकल्स व हेन्री ऑर्क्डिडन, सॅम्युअल ऑस्टिन, डॉ. जॉन फ्रायर, डच साधनात, हर्बर डिजोगर, डच वकील डाग रजिस्टर फ्रेंच साधतात. मार्टीन ङर लेारिसपळश खपवशी ेीळशपींरश्रशी अ‍ॅब केरेचे तरूरसश ऊशी खपवशी जीळशपींरश्रशी. ढहश कळीीं ेपश वश डर्शींरक्षळ डोर्लेन्स,पोर्तुगीज साधतात. कॉस्मि द ग्वार्द फॉसिक्स द सौज ज जीळशपींश उेपर्सीळीीेंवे फ्रेंच प्रवाशापैकी ट्रव्हर्निअर (1642-66) बर्निअर (1655-67) थेवेनो (1665-67) डर्ली (1669-74) डिलव्हेल, पोर्तुगीज प्रवासी फादर पिएर द ऑलिन्स (1688) कळीीेींळश ऊश ीर्शींरक्षळ इटालियन प्रवासी निकोलस मनूची, डीेांश ऊे चेसेी थिवेना, कॅरेरी, नॉरिस, लिजेंडस् ऑफ द कोकण कॅप्टन अलेक्झांडर हॅमिल्टन अ न्यू अकाऊंट ऑफ ईस्ट इंडीज (1727) डॉबर्ड या सर्वांनी सामाजिक, आर्थिक, व्यापारी व धार्मिक कोकण महाराष्ट्रीय जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास त्यांनी लिहिला. अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी या लेखन सामुग्रीच्या आधारे अज्ञात साधनांचा शोध घेऊन इतिहासाचे दर्शन घडविले तर मागील सुवर्णकाळ पुन्हा पाहू शकू.

     जरी काळाच्या अज्ञात गुहेत छत्रपतींचे साहुकार कुशे दृष्टिक्षेपात येत नसले तरी कुशेवाड्यात त्यांचे अस्तित्व अजूनही जाणवते. यावेळी अथर्व वेदातील एक ऋचा त्यांच्यासाठी गावीशी वाटते,

वैश्य :     इंद्रमह वणिज चोदयामि स न ऐतू पुरु

     एतानो अस्तू ।

     नुदन्नपति पग्विस्थिन मृगं स इशानो धनदा अस्तू मह्यम ॥

                        (अथर्व वेद 3/15/1)

     मी ऐश्वर्य संपन्न वैश्याला पुढे करतो आहे. त्यांनी आमच्याकडे यावे. आमच्या

आर्थिक अडचणी दूर करण्याकरिता आमचा नेता व्हावे. कंजूष व्यापाराला विरोध करणार्‍या व क्रूर कर्म करणार्‍या व्यक्तींना बाजूला काढून किंवा सारून आम्हाला धन देणारा होवो.