सतीश पाटणकर
किल्ले रामगड कोकणातील कणकवली-आचरे मार्गावर ठाण मांडूनबसलेला नितांतसुंदर पण उपेक्षित असा किल्ला. गड नदी (कालावली) च्याकाठावरील एका छोट्या टेकडीवर वसलेला हा बळकट बांधणीचा किल्ला. समुद्रसपाटीपासून पक्त ५० मीटर उंचीवर उभा आहे. जांभ्या दगडाची खणखणीततटबंदी, त्यात बांधलेले तब्बल १५ बुरूज, एकाहून एक सरस तीन दरवाजे, गणरायाची आगळी-वेगळी मूर्ती, सर्वांना आपल्या धाकात ठेवणारा वेताळदेव, राजवाड्याचा सुंदर चौथरा व इतिहासकाळातील अनेक तोफा या दुर्गावशेषांमुळे किल्ले रामगड दुर्ग अवशेष संपन्न बनला आहे.
रामगडला भेट देण्यासाठी आपणास प्रथम मुंबई-गोवामहामार्गावरील कणकवलीला पोहोचावे लागते. कणकवलीहून गड-पायथ्याचे रामगड फक्त१५ कि.मी. अंतरावर असून ते कणकवली-आचरे मार्गावरच आहे. पायथ्याच्या रामगडगावातून गडमाथा २० मिनिटांच्या चालीवर असून गडावर पाण्याची सोय नाही.त्यामुळे गावात पाण्याच्या बाटल्या भरून गडमाथा गाठावा लागतो.
रामगडच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरूज असून याप्रवेशद्वारातून आत गेल्यावस दोन्ही बाजूस असणाऱ्या पहारेकऱ्यांच्यादेवड्या दिसतात. त्या पाहून दरवाजाच्या माथ्यावर चढण्यासाठी असणाऱ्याजिन्याने प्रवेशद्वाराचा माथा गाठायचा. येथून सभोवार नजर टाकताच रामगडाचाझाडीभरला माथा पाहायला मिळतो. या गडाची संपूर्ण तटबंदी व बुरूज जांभ्यादगडात बांधलेली असून यातील दरजा भरण्यासाठी चुन्याचा अगर कशाचाच वापरकेलेला नाही. तरीही गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी अवस्थेत आहे.
प्रवेशद्वाराच्या माथ्यावरून खाली उतरायचे व मुख्यदरवाज्यातून फक्त ५०फूट अंतरावर त्याच तटात बांधलेल्या दुसऱ्या दरवाज्यातपोहोचायचे. आपण हा दरवाजा पाहून परत गडप्रवेश केलेल्या मुख्य दरवाजाजवळयायचे व येथून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाटेने गड पाहायला सुरूवात करायची. यावाटेने पुढे जाताच डाव्या हातास एका झाडाखाली वारूळांनी सभोवार फेक धरलेलावेताळदेव दिसतो. भूतनाथ किंवा वेताळदेव हा कोकणवासियांत आपल्या धाकातठेवणारा देव म्हणून ओळखला जातो. हा वेताळदेव पाहून पुढे गेल्यावर चारीबाजुंनी भक्कमपणे बांधलेला राजवाडा दिसतो. राजवाड्यात गेल्यावर समोरचतुळशीवृंदावन व ओवऱ्यांच्या भिंती लक्ष वेधून घेतात. या सर्वात लक्षवेधकगणरायाची मूर्ती एका देवळीत असून या मूर्तीच्या पायात सात कवट्या व गळ्यात नर मुंडमाळा आहेत.
रामगडावरील बाप्पांची ही मूर्ती तंत्रमार्गीयांची असून यामूर्तीची एकूणच दुर्मिळ घडण पाहता तिची जपणूक गरजेची ठरते. हा वाड्याचापरिसर पाहून याच्या थोड्या पाठीमागे असणाऱ्या गडावरील सदरेवर जायचे.सदरेच्या समोरच वेगवेगळ्या आकाराच्या व वेगवेगळ्या उंचीच्या जमिनीत उलट्यापुरून ठेवलेल्या सात तोफा दिसतात. तोफांशेजारीच जांभ्या दगडातील समाधी आहे.या तोफा व समाधी पाहून त्यासमोरील गड नदीच्या दिशेस असणाऱ्या गडाच्यातिसऱ्या दरवाजात जायचे. अत्यंत भक्कम बांधणीचा दरवाजा सद्यस्थितीतील त्याच्यावरील झुडुपांमुळे कमकुवत बनला आहे.
हा गड शिवकालात बांधला असला पाहिजे. १८ व्या शकतात पेशवे वतुळाजी आंग्रे यांच्यातील लढाईवेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला. पुढे१८०४-०५ मध्ये गड परत पेशव्यांच्या ताब्यात गेला. तर ६ एप्रिल १८१८ मध्येकॅप्टन पिअरसनच्या नेतृत्वाखाली गड इंग्रजांनी जिंकून घेतला. १८६२च्यापाहणीनुसार रामगडावर २६ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेखआहे.